UPI Payments : आपला भारत देश हा UPI पेमेंट मुळे जगभरात ओळखला जात आहे. UPI मुळे अनेक बाजूनी आपलं जगणं हे सोपं झालेलं आहे. एकतर अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी आता बँकेत जाण्याची गरज उरलेली नाही त्यामुळे काय होतं तर अधिकांश वेळ हा इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये खर्च करण्याची संधी मिळते. आपल्या देशात कोपऱ्या कोपऱ्यातील छोट्या छोट्या दुकानांपासून ते थेट मोठ मोठ्या मॉलमध्ये सुद्धा UPI चा वापर केला जातो. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तर देशातील UPI पेमेंटनी नवीन विक्रम करून दाखवला, नोव्हेंबर महिन्यात UPI पेमेंटनी 17.4 ट्रिलियन रुपयांपर्यंत व्यवहार करून दाखवला आहे.
देशात UPIचा नवीन विक्रम: (UPI Payments)
UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस, यामुळे आपण जगभरात ओळखले जात आहोत. दिवसेंदिवस UPI पेमेंटच्या संख्येत आपल्या देशात वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात UPI पेमेंटमध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झालेली आहे. नोव्हेंबरचा काळ हा दिवाळीचा असल्यामुळे कदाचित आर्थिक व्यवहार वाढले असतील. ऑक्टोबरच्या पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील UPI च्या व्यवहारात वाढ झाल्यामुळे आपला देश तांत्रिकरित्या नवीन गोष्टींचा अवलंब स्वीकारत आहे याची खात्री पटते.
सलग चौथ्या महिन्यात आपण UPI द्वारे 1000 कोटी रुपयांच्या पुढे जात व्यवहार केले आहेत. आज- काल अनेक लोकं हातात पैसे घेऊन व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल पेमेंटला जास्ती प्राधान्य देतात. आणि हा मार्ग जास्त सोयीस्कर समजला जातो. तज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2027 पर्यंत UPI व्यवहारांची संख्या ही दररोज 100 कोटीचा आकडा देखील पार करू शकते, तसेच पाच वर्षात दुकानातील 90% व्यवहार हे UPIद्वारे होण्याची अपेक्षा आहे.
UPI सोबत फास्टट्रॅक व्यवहारांमध्ये ही वाढ:
गेल्या दोन महिन्यात आपण केवळ UPI मध्येच सकारात्मक वाढ दर्शवलेली नाही तर फास्टट्रेक मध्ये देखील 321 दशलक्ष रुपयांची वाढ झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात फास्टट्रॅकवरून झालेल्या व्यवहारांचे मूल्य 5303 कोटी रुपये होते जे ऑक्टोबर मधल्या 553 रुपयांच्या तुलनेत चार टक्क्यांनी कमी आहे.