UPI Transaction: आजच्या जमान्यात कोणी हातात पैसे घेऊन जात नाही किंवा व्यवहार तर मुळीच करत नाही. काही दिवसांपूर्वी आपण पैशाऐवजी क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करायचो, त्यानंतर सुरु झालं नेट बँकिंग म्हणजेच काय तर इंटरनेटचा वापर करून आर्थिक व्यवहार करणे. या इंटरनेटमुळे कामं जेवढी सोपी झाली तेवढीच कठीण आणि डोक्याला ताण देणारी सुद्धा बनली आहेत. अनेकवेळा काय होतं कि आपण पैसे तर पाठवतो पण ते कधीतरी ट्रान्स्फर होतच नाहीत किंवा झाले तरीही चुकीच्या खात्यात जातात. एकदा चुकीच्या खात्यात गेलेले पैसे म्हणजे नुकसानच नाही का? ते पैसे कधीतरी परत मिळतील का हे आता पाहूया…
चुकीच्या खात्यात पैसे गेले तर? UPI Transaction
इंटरनेटचा वापर करत पैसे पाठवताना (UPI Transaction) एखादा नंबर चुकला तर सगळीच्या सगळी रक्कम कुणा भलत्याच माणसाच्या खात्यात जाऊ शकते. त्यांनतर तो माणूस मालामाल होईल पण कारणाशिवाय तुमचं मात्र होईल नुकसान. मग अश्यावेळी काय करावं? घाबरून जाण्याची गरज नाही कारण यावर देखील उपाय उपलब्ध आहे. तुम्ही चुकून ट्रान्स्फर झालेले पैसे परत मिळवू शकता.
यासाठी सर्वात आधी काय करावं तर ज्या बँक मध्ये तुमचं खातं आहे त्या बँकशी त्वरित संपर्क साधावा. बँकचे कर्मचारी तुम्हाला कधी रक्कम ट्रान्स्फर केलीत, कोणत्या तारखेला केलीत, वेळ काय होती इत्यादी काही महत्वाचे प्रश्न विचारतील, त्या सर्व प्रश्नांची योग्य माहिती द्या. कारण हीच माहिती तुम्हाला पैसे परत मिळवायला मदत करणार आहे.
यानंतर तुमचा व्यवहार कसा चुकला याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि मग बँक तुमच्या उत्तरांवरून सगळ्या समस्येचं मुल्यांकन करेल. आता मात्र बँकच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सर्व मूल्यांचे पालन करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कारण इथून पुढे बँक तुमच्या केलेल्या तक्रारीबद्दल तपास करत असते.आणि तुम्ही तुम्ही दिलेली माहिती जर का सर्व बाजूंनी योग्य असेल तर तुम्हाला पैसे परत केले जातात (UPI Transaction).
बँक तुमची प्रायव्हसी जपते:
तुम्ही बँक दिलेल्या माहितीबद्दल पूर्णपणे निश्चिंत राहू शकता कारण ती माहिती बँक अजून कुणासोबत वापरणार नाही किंवा त्या माहितीचा वेगळा व्यवहार केला जाणार नाही. बँक याबद्दल लेखी खात्री सुद्धा देईल सगळ्या गोष्टींची पडताळणी होण्यासाठी काही वेळ नक्कीच जाईल पण तुम्ही निश्चिंत रहाव कारण तुमचे पैसे बँक नक्कीच परत करणार आहे.