UPI Transaction Limit : RBI चा मोठा निर्णय; UPI Transaction चे लिमिट वाढवलं

UPI Transaction Limit : आपला देश हा जगभरात UPI पेमेंटसाठी ओळखला जातो. अगदी काही बटनांच्या क्लिकवर आपण कुणालाही क्षणार्धात पैसे पाठवू शकतो. जर का तुम्ही Gpay, Amazon Pay, PayTM, Phonepe यांसारख्या ॲप्सचा वापर करून पैश्यांचे व्यवहार करत असाल तर आत्ताची ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. देशात सर्वोच्च मानली जाणारी बँक म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया, देशात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींची जबाबदारी रिझर्व बँकवर सोपवली गेली आहे. त्यामुळे अनेक आर्थिक घटकांवर नियंत्रण आणण्यासाठी RBI वेळोवेळी अनेक कायदे आणि योजना अंमलात आणत असते. आता देखील बँकने एक मोठी घोषणा केली आहे. देशभरात चाललेल्या UPI चा वापर लक्षात घेता RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPIद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व बँकने वाढवली UPI ची मर्यादा: UPI Transaction Limit

आता बहुतांश आर्थिक व्यवहार करण्यासाठी केवळ UPI चा वापरच केला जातो, मात्र याद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी इंटरनेटचा वापर करून पैशांची देवाणघेवाण ही काही अंशी मर्यादित केली गेली आहे. मात्र UPI चा वाढता वापर आणि लोकांच्या गरजा लक्षात घेता RBIचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे पेमेंटची मर्यादा (UPI Transaction Limit) एक लाख रुपयांवरून थेट पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. मात्र लक्षात घ्या की हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्येच करता येतील, इतर कोणत्याही ठिकाणी एवढी मोठी रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही.

देशभरात UPI द्वारे करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा आकडा वाढला आहे. गेल्या महिन्यात UPIच्या व्यवहारांनी 17.4 लाख कोटी रुपयांचा नवीन विक्रम रचला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आपण UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या एकूण 54 टक्क्यांनी वाढवली आहे आणि मूल्यांच्या बाबतीत यात 46 टक्क्यांची वाढ झालेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आकडेवारी सांगते की UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांचे मूल्य महिन्याला 1.45 टक्क्यांनी वाढले आहे.

या व्यतिरिक्त काय म्हणाले गव्हर्नर?

UPI ची मर्यादा वाढवल्याबरोबरच (UPI Transaction Limit) रिझर्व बँकच्या गव्हर्नरांनी महागाई बद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे. सध्या देशातली महागाई आटोक्यात असली तरी सुद्धा अन्नधान्याच्या महागाईत वाढ होताना दिसते असे ते म्हणाले. महागाईचा दर चार टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट अजून पर्यंत आम्ही गाठू शकलेलो नाही, तरीही प्रयत्न सोडून चालणार नाहीत आणि काम करत राहावे लागणार आहे असेही त्यांचे म्हणे होते.