UPI Transactions : डिजिटल पेमेंटचा विक्रमी पराक्रम; UPI व्यवहारांचा टप्पा 9.3 अब्जांच्या पार

UPI Transactions : देशात सध्या UPI चा वापर वाढला आहे. छोट्यातल्या छोट्या दुकानांपासून मोठ्या मॉलमध्ये UPI चा वापर केला जातो . जूनमध्ये या व्यवहारांची संख्या वाढत त्यांनी 9.3 अब्जांच्या पल्ला गाठला आहे. जानेवारी 2022चा आकडा लक्षात घेता यात दुप्पट वाढ झालेली आहे. UPI सेवेची वाढ हि भारताला प्रगती करण्यासाठी मदत करणार आहे. UPIची सोय असल्यामुळे हातात पैसे घेऊन जाण्याची गरज नसते व म्हणूनच हा एक सोयीचा मार्ग बनला आहे.

UPI च्या व्यवहारात झाली मोठी वाढ : UPI Transactions

UPI तर्फे चालेल्या व्यवहारांमध्ये (UPI Transactions) मोठी वाढ झालेली आहे. हा आकडा जानेवारी 2022 मध्ये 8.3 लाख कोटी होता जो जूनपर्यंत वाढून 14.7 लाख कोटी रुपये झाला आहे. हि वाढ P2M म्हणजेच माणूस ते दुकानदार अशी आहे. दुकानातून समान खरेदी केल्यानंतर अधिकवेळा आपण UPI चा वापर करून पैसे भरत असतो, यामुळेच UPI व्यवहारांमध्ये एवढ्या वाढीची नोंद झाली आहे.

हा व्यवहार दिवसेंदिवस अधिक वाढेल अशी शक्यता मांडली जात आहे, हा हिस्सा वाढत 75 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. लोकांकडून गुगल पे (Google Pay) आणि फोन पे (Phone Pay) चा अधिक वापर UPI पेमेंटसाठी केला जात आहे. गेल्यावर्षी या पेमेंटची संख्या 94.55% होती ज्यात वाढ होत ती आता 95.67% झाली आहे. व्यक्ती ते व्यापारी या व्यवहारांमध्ये वाढ झाली असली तरीही त्यांच्या मूल्यांच्या पातळीमध्ये घट झालेली आहे.

या राज्यांमध्ये UPIचा सर्वाधिक वापर :

सर्वात अधिक UPI पेमेंट(UPI Transactions) वापरणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ,तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात, आंद्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो. भाजीपाला खरेदी, रिचार्ज, लाईट-फोन बिल,पैसे पाठवणे, बेकारी, औषधे अश्या ठिकाणी आजकाल UPIचा वापर वाढत आहे. लोकं पैसे कॅशने न देता UPI द्व्यारे पाठवणे जास्त सोयीस्कर मानतात. डिजिटल व्यवहारांमध्ये सातात्याने वाढ होत आहे, हि वाढ केवळ शहरांमध्येच नाही तर अलीकडे गावांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार (UPI Transactions) होत आहेत. मोबाईलच्या माध्यामातून होणारे हे व्यवहार येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वाढतील.