Share Market : ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी; 2 दिवसात 43 टक्क्यांनी वाढ

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट मध्ये कधी कोणता शेअर तेजीत येईल हे सांगता येत नाही. कधी कधी तर अचानकपणे शेअर्समध्ये इतकी उसळी येते कि आपलाही त्यावर लवकर विश्वास बसत नाही. बॅटरी आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी उर्जा ग्लोबल लिमिटेडबाबत सुद्धा हेच घडले आहे. गेल्या 2 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उर्जा ग्लोबल लिमिटेडने बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी टेस्ला पावर यूएसए सोबत करार केला आहे. या करारानंतरच उर्जा ग्लोबल लिमिटेडच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. उर्जा ग्लोबल लिमिटेडचे ​​शेअर्स गेल्या 5 दिवसात 55% पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढले आहेत. यापूर्वी 6 जून 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर उर्जा ग्लोबलचे शेअर्सची किंमत 8.18 वर होती तर आज म्हणजेच 12 जून 2023 रोजी बीएसईवर उर्जा ग्लोबलचे शेअर्स 12.74 रुपयांवर पोहोचले आहेत.

उर्जा ग्लोबलने टेस्ला पावर यूएसए करार केल्याची बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर गुंतवणूक दारांना ते एलोन मस्क यांचेच टेस्ला समजून ऊर्जा ग्लोबलचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी केली. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टेस्ला पॉवर यूएसए चारचाकी कारसाठी बॅटरी बनवते आणि एलोन मस्क यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. तर ती प्रत्यक्षात टेस्ला नावाची दिल्लीस्थित प्रमोटरची यूएसए मधील उपकंपनी आहे.