बिझनेसनामा ऑनलाईन । आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. परंतु सध्याच्या या महागाईच्या काळात घराच्या किंमतीसुद्धा गगनाला भिडल्या आहेत. घराच्या महागड्या किमतींमुळे एकरकमी पैसे देऊन घर खरेदी करणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच काम आहे. अशावेळी आपण कर्ज काढून (Home Loan) हफ्त्याच्या रूपात म्हणजेच महिन्याला ठराविक रकमेचा EMI भरून घर खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु गेल्या वर्षभरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने ज्याप्रकारे सातत्याने रेपो रेट मध्ये वाढ केली आहे त्याचा मोठा फटका गृहकर्ज भरणाऱ्या लोकांना होत आहे. रेपो रेट वाढला तर आपोआपच गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होते. त्यामुळे EMI हा बोझ नेमका कसा कमी करायचा याबाबत आज आम्ही तुम्हाला 3 पर्याय सांगणार आहोत. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
1) कर्जाचा कालावधी वाढवा-
जर समजा तुम्ही ३० लाखांचा जरी फ्लॅट घेतला असेल तरी गेल्या वर्षभरात रेपो रेटमध्ये सातत्याने करण्यात आलेल्या वाढीमुळे महिन्याच्या EMI मध्ये ३ ते ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील बजेट कोलमडू शकत आणि खिश्यावर आणखी भारही पडू शकतो. अशावेळी जर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवला तर आपोआपच तुमच्या EMI ची रक्कम कमी होऊ शकते. परंतु याचे एक नुकसान म्हणजे तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी अजून जास्त वेळ लागेल आणि कर्जाच्या रकमेत सुद्धा वाढ होऊ शकते.
2) गृहकर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा–
रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. परंतु जशी इतर क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळते तशीच स्पर्धा बँकिंग क्षेत्रात सुद्धा असते. त्यामुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर केल्यानंतर काही बँका व्याजदराश इतरही अतिरिक्त सवलती देतात. त्यामुळे समजा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही बँकेत लोन ट्रान्सफर केलं आणि त्या बँकेने तुम्हाला 0.50% व्याजदर कमी दिला तरी त्याचा मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्या महिन्याच्या EMI चा भार काही प्रमाणात कमी होईल.
3) प्रीपेमेंट करण्याचा प्रयत्न करा –
वर्षातून कधी कधी तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. काही जणांना पगाराचा बोनस मिळतो, ग्रामीण भागातील लोकांना शेतीतून एकगठ्ठा पैसा मिळू शकतो. तर अशावेळी ते पैसे एकरकमी बँकेत भरून प्रीपेमेंट केलं तर तुमच्या गृहकर्जाचा कालावधी किंवा EMI रक्कम कमी होऊ शकते. त्यामुळे हा पर्याय सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.