VAT on Liquor in Maharashtra : देशात मद्यपानाचा चाहतावर्ग मोठा आहे, देशी किंवा विदेशी कोणतीही दारू असली तरीही त्याला मागणी भरपूरच असते. मात्र आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून दारूच्या किमतींमध्ये वाढ केलेली असल्यामुळे दारूच्या चाहत्यांना महाग दारू विकत घ्यावी लागणार आहे. हि दरवाढ 1 नोव्हेंबर 2023 पासून राज्यभरात लागू होईल, आता कसा असेल नवीन दर आणि का वाढल्या या किमती जाणून घेऊया थोडक्यात…
राज्यात दारूच्या किमती वाढल्या : VAT on Liquor in Maharashtra
यासंबंधीची अधिकृत सरकारी अधिसूचना 20 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली. 1 नोव्हेंबर 2023 पासून राज्यभरात मद्य सेवांवर 5% व्हॅटची वाढ (VAT on Liquor in Maharashtra) होणार आहे. आता नवीन कर 10 टक्के झाल्यामुळे क्लब, लाउंज आणि बारमध्ये दारू पिणाऱ्यांना महाग दारू विकत घावी लागेल, मात्र नॉन-काउंटरवरून होणारी विक्री पूर्वीच्या किमतीवर कायम असेल. आपल्या देशात दारूची विक्री हि भरपूर प्रमाणात होते, त्यामुळे सरकारला देखील यातून फायदा मिळत असतो. आता बदलेल्या आकड्यांचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं रंचक ठरणार आहे.
मद्य कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम:
अहवालानुसार, स्टार हॉटेल्समध्ये ऑफर केल्या जाणार्या मद्य सेवांसाठी कोणत्याही कर दरात वाढ होणार नाही. मात्र परमिट रूममधील मद्य सेवांसाठी एकूण व्हॅट दर 10 टक्के असेल. शिंदे-फडणवीस यांच्या नवीन निर्णयामुळे राज्यातील मद्य कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम होऊ शकतो. या दरवाढीचा मोठा परिणाम युनायटेड स्पिरिट्स, युनायटेड ब्रुअरीज, रॅडिको खेतान, सुला विनयार्ड्स, टिळक नगर इंडस्ट्रीज, पिकाडिली ॲग्रो इत्यादींच्या शेअर्सवर झालेला दिसू शकतो.