Vedanta Groups :आपला देश दिवसेंदिवस टेक्नोलोजीच्या क्षेत्रात प्रगती करत आहे. दिवसेंदिवस उत्तम कामगिरी करत आपण जगावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत आहोत. वेदांता समूहाबद्दल नाव तुम्ही ऐकलंच असेल, हीच कंपनी आता महाराष्ट्रात नवीन प्लांट सुरु करणार होता पण काही कारणास्तव तो समूह पुन्हा गुजरातमध्ये गेला, यानंतर तैवानी कंपनी फॉक्सकॉनने कंपनीसोबतचा करार रद्ध केला. पण आता वेदांता समूह पुन्हा हा प्लांट सुरु करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत,यात कंपनीला नेमकी कोणाची साथ मिळाली हे जाणून घ्या …
Vedanta Groups सुरु करणार नवीन प्लांट:
येणाऱ्या काही दिवसांमध्ये वेदांता समूह एक नवीन सेमीकंडक्टरचा प्लांट सुरु करणार आहे. अनेक कंपन्यांसोबत त्यांनी चर्चा सुरु केली असून गुजरातमध्ये हा प्लांट उभारला जाईल. गुजरातमधील गुंतवणूकदार जे कि इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये पैसे गुंतवू पाहत आहेत त्यांच्यासाठी हि खास संधी चालून आली आहे. वेदांता कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जपानमधील कंपन्या भारतात पहीले इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन करण्यासाठी वेदांता समूहाशी हातमिळवणी करू पाहत आहेत.
भारत आणि जपानमध्ये जा का हा करार यशस्वीपणे पार पडला तर अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच गुंतवणूकदारांना इथे 80 अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध आहे. जपानमधून भारतात गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी वेदांता समूह हा सूत्रधार म्हणून काम करेल. गेल्या वर्षीच्या अखेरीस कंपनीने भारतातील सेमीकंडक्टर आणि ग्लास डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी 30 जपानी तंत्रज्ञान कंपन्यांसोबत करार केले