Vedanta Shares । वेदांता लिमिटेड (Vedanta Company) हि एक भारतीय खाण कंपनी आहे, जिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. वेदांता कंपनी हि खाणींचा व्यवसाय करते. विशेषकरून सोने, अल्युमिनियम, कॉपर,स्टील इत्यादींचा धातूंचा या व्यवसायात समावेश आहे . मात्र अनिल अग्रवाल यांची वेदांता हि कंपनी मोठ्या कर्जांचा सामना करताना दिसते आणि हल्लीच मुडीज इन्वेस्टर्सने देखील या कंपनीचे क्रेडीट रेटिंग कमी केले आहे.
वेदांताचे क्रेडीट रेटिंग का कमी झाले?
कंपनीने घेतलेले कर्ज त्यांच्याकडून परत केले जाऊ शकत नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे कंपनीचे क्रेडीट रेटिंग कमी झाले आहे. मुडीज इंवेस्टर्सना वेदांता बद्दल जराही खात्री नसल्यामुळे त्याचा वाईट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झालेला दिसतो. वेदांता कंपनीला जानेवारी 2024 पर्यंत सुमारे 8,300 कोटी रुपये व्याजासह परत करावे लागणार आहेत. मात्र मुडीजच्या म्हणण्याप्रमाणे कंपनीकडून अजून कर्ज परतफेडीचे कोणतेही प्रयत्न दिसत नाही आहेत, ते कर्ज परत फेडू शकतील कि नाही अशी शंका मुडीजला असल्यामुळे त्यांनी वेदांताचे रेटिंग कमी केले आहे.
बुधवारी (Vedanta Shares) वेदांता कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत आणि 210 रुपयांवर येऊन पोहोचले. हि स्थिती कंपनीच्या भविष्यासाठी बरोबर नाही. सध्या या कंपनीचे शेअर्स 52 आठवड्याच्या नीचांक पातळीवर येऊन पोहोचले आहेत.
वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी घसरण का? Vedanta Shares
कंपनीचे शेअर्स एवढे घसरण्यामागे मूळ कारण मुडीज इंवेस्टर्स आहेत, त्यांचा नकारात्मक दृष्टीकोन कंपनीसाठी महागात पडला आहे. मुडीजनी वेदांता कंपनीला Caa1 वरून Caa2 चे कमी रेटिंग दिल्यामुळे कंपनीचे शेअर्स कमी झाले आहेत. आणि सोबतच कंपनीवर कर्जाची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी आत्तापर्यंत कंपनीचे शेअर्स (Vedanta Shares) 33% घसरले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स 316.10 रुपये होते. तर सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 210 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच कंपनीच्या शेअर्स मध्ये 23% घसरण झाली आहे.