Vehicle Selling | देशात सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे, मागच्याच महिन्यात आपण आनंदाने गणेश चतुर्थी साजरी केली आहे पुढच्या महिन्यात येणाऱ्या दिवाळीच्या तयारीत गुंतलो आहोत. सण म्हटलं कि आपोआपच एक सकारात्मक वातावरण तयार होतं. सभोवताली एक उर्जा असल्यासारखं वाटतं आणि मन प्रसन्न व्हायला मदत होते. कदाचित म्हणूनच या काळात अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. त्याचाच भाग म्हणजे सप्टेंबर महिन्यात गाड्यांची विक्री चांगलीच वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात 3 लाखांपेक्षा जास्त गाड्यांची विक्री झाली आहे.
सणासुदीच्या काळात बाजारत नवीन वाहने दाखल:
लोकांची वाढती मागणी पाहता बाजारात नवीन वाहनं विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत, वर्षातल्या इतर दिवसांपेक्षा सणांच्या काळात हि मागणी वाढत जाते अशी एकंदरीत गोष्ट समोर आली आहे. मागच्या सप्टेंबर महिन्यात वाहन खरेदीच्या आकड्याने उचांक गाठला. सप्टेंबर महिन्यात चतुर्थी आल्यामुळे साहजिकपणे हा आकडा मोठ्या जोमाने वाढल्याचं लक्ष्यात येतं. पुढे येणारे सण म्हणजे दिवाळी आणि दसरा, दसऱ्याला नवीन गोष्टी विकत घेण्याचा हमखास माहोल असतो त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात हा आकडा ( Vehicle Selling) किती उच्चांक गाठतो हे पाहणं आकर्षक ठरणार आहे.
यामुळे गाड्यांची विक्री वाढली- Vehicle Selling
होंडा एलीव्हेट, सिंट्रोन सी-3 एअर क्रोस, टाटा नेक्सोन इत्यादी गाड्या बाजारात दाखल झाल्यामुळे सप्टेंबर महिन्यात वाहन विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. देशातील बाजारपेठेत सुमारे 3 लाख 63 हजार 733 वाहनांची विक्री (Vehicle Selling) झाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या मासिक खरेदी मध्ये सप्टेंबर महिन्यातली खरेदीने मोठा आकडा पार केला. ऑगस्टमध्ये 3 लाख 60 हजार 700 वाहनांची विक्री झाली होती. वार्षिक दृष्ट्या पाहायला गेल्यास यावेळी 2.4% वाढ झालेली आहे.
देशातील सर्वात प्रसिद्ध मोटार उत्पादन कंपनी म्हणजेच मारुती सुझुकीने एकूण 1 लाख 81 हजार 343 वाहनांची विक्री केली, SUV चा यात सर्वाधिक वाटा होता . त्यानंतर महिंद्रा आणि महिन्द्रा या कंपनीने सप्टेंबरमध्ये 75 हजार 604 वाहनांची विक्री केली, आणि टाटा मोटर्सनी एकूण 80 हजार 633 वाहनांची विक्री केली.