बिझनेसनामा । सध्याच्या काळात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology for agriculture) उपलब्ध झाले आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. ज्यामुळे आजकाल अनेक तरुणही पुन्हा शेतीकडे (Agriculture) वळू लागले आहेत. सध्या देशात लागवडीखालील जमीन कमी होत असल्याने कमी जागेतून जास्त नफा मिळवण्यासाठी नवीन तंत्र वापरणे गरजेचे बनले आहे. जर आपल्यालाही एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपण हळदीच्या लागवडीचा (Cultivation of Turmeric) विचार करू शकता. कारण याद्वारे मोठी कमाई देखील करता येऊ शकेल. चला तर मग आज आपण याविषयीची माहिती जाणून घेउयात…
कमी जागेमध्ये जास्त उत्पादन-
सध्या शेतीसाठी कमी जागेमध्ये जास्त उत्पादन मिळवून देणारे तंत्र वापरले जात आहे. ज्याला व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) असे म्हणतात. शेतीशी संबंधित अनेक मोठ्या कंपन्यांकडूनही अशाच प्रकारची शेती केली जाते. याद्वारे एक एकर जमीनीमध्ये 100 एकर जागे इतके उत्पादन मिळवता येते. जर आपल्यालाही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हळदीच्या शेतीद्वारे मोठा फायदा मिळवता येऊ शकेल.
‘या’ गोष्टींची गरज भासेल-
हे लक्षात घ्या कि, व्हर्टिकल फार्मिंगसाठी आपल्याला सर्वांत आधी जीआय पाईप (GI Pipe) आणावे लागतील. यानंतर या पाईप्सवर 2-3 फूट खोल आणि 2 फूट रुंद लांब कंटेनर उभे केले जातील. यामधील प्रत्येक कंटेनरचा वरचा भाग उघडा राहील. ज्यामध्ये हळदीचे (Turmeric) पीक घेतले जाईल.
अशा प्रकारे केले जाते व्हर्टिकल फार्मिंग-
हळदीच्या व्हर्टिकल फार्मिंगसाठी 10-10 सेमी अंतरावर तिरपे बॉक्स ठेवले जातात. यानंतर कंटेनरमध्ये हळदीच्या बिया दोन ओळींमध्ये लावल्या जातात, ज्यामध्ये हळदीचे रोप येईल. जे सरळ वरच्या दिशेने सरकत जाते. यानंतर जसजशी झाडाची वाढ होईल तसतशी पाने बाजूने बाहेर येतील. हे लक्षात घ्या कि, व्हर्टिकल फार्मिंग हे हळद लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जाते.
किती कमाई मिळेल ???
जर आपण एका वर्षात 250 टन हळदीचे पीक घेतले तर याद्वारे 2.5 कोटी रुपयांची कमाई होईल. तसेच जर यासाठी आलेला खर्च हा 70 ते 80 लाखांच्या घरात गृहीत धरला तरी दीड ते अडीच कोटी रुपये सहज मिळू शकतील. तसेच या हळदीची पावडर बनवूनही ती विकता येईल.