Vi 5G Recharge Plans : Vi चे 5G प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स समोर; ग्राहकांना मिळणार हे फायदे

Vi 5G Recharge Plans: देशभरात अनेक वापरकर्ते वोडाफोन आणि आयडिया(Vi) यांच्या एकत्रीकरणानंतर त्यांच्या दिशेने वळत आहेत. तसेच ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी देखील नवनवीन योजना राबवते. यात ग्राहकांना कंपनीसोबत जोडून ठेवण्यासाठी अनोखे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून दिले जातात. सध्या पुणे आणि दिल्ली या शहरांच्या काही निवडक भागांमध्ये कंपनीने 5G सेवा सुरु केल्या आहेत. आजकाल घर बसल्या अनेकजणं काम करतात, कामासाठी कंपनीमध्ये जाण्याची गरज आता उरलेली नाही. पण घर बसल्या काम करत असताना तुम्हाला मुबलक प्रमाणात इंटरनेटची साथ मिळाली पाहिजे नाहीतर काम अडकून पडेल आणि अधिकाऱ्यांची नाराजी स्वीकारावी लागेल. काही लोकं घरी देखील WIFI चा वापर करतात पण इतर मंडळी आजही मोबाईल डेटावर अवलंबून आहेत. आता Vi कडून त्यांच्या 5G प्लॅन्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही जर का Viच्या 5G सेवांचे ग्राहक असाल तर हि बातमी नक्की वाचा…

असे आहेत नवीन Vi 5G Recharge Plans:

अलीकडेच Airtel आणि Jio यांनी 5G सेवा ग्राहकांसाठी सुरु केल्या होत्या. त्यानंतर मागोमाग आता Vi देखील ग्राहकांसाठी 5G सेवा घेऊन आला आहे. पुणे आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये सुरु असलेल्या या सेवांबद्दल आता कंपनीने नवीन रिचार्ज प्लॅन्सची घोषणा केली आहे. 5G सेवांमध्ये इंटरनेटची स्पीड अधिक असते, तसेच सोबत डेटाही दिला जातो (VI 5G Recharge Plans). तुम्ही जर का VI चे प्रीपेड सिम कार्ड वापरात असाल तर तर कंपनीचा 75 रुपयांचा प्लॅन हा खास तुमच्यासाठी बनला आहे. तसेच जर का तुम्ही पोस्टपेड वापरकर्ते असाल तर कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे REDX 1101 असा प्लॅन विकत घ्यावा लागेल. आणि वापरकर्त्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजे हा मोबाईल नंबर दिल्ली किंवा महाराष्ट्रात रजिस्टर्ड असला पाहिजे.

4G सिमवर मिळवा 5G सेवा:

बाकी टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे Viच्या वापरकर्त्यांना सुद्धा नवीन सिमकार्ड विकत घेण्याची गरज नाही. आधीपासूनच जर का तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हाला 4G सिमचा वापर करून 5G सेवा मिळवणे शक्य आहे. पण यासाठी अनिवार्य घटक ठरतो तो म्हणजे 5G सेवेला सपोर्ट करणारा मोबाईल फोन, तसेच 5G सेवा तुमच्या आजूबाजूला उपलब्ध असली पाहिजे (Vi 5G Recharge Plans). दिल्ली आणि पुण्याच्या अनेक भागांमध्ये ग्राहक या नवीन सेवेचा लाभ घेत आहेत आणि फास्ट स्पीड इंटरनेटमुळे ते पूर्णपणे खुश आहेत.