VI 5G Services : देशातील या 2 शहरात VI देतेय 5G Services; Jio आणि Airtel ला देणार टक्कर

VI 5G Services । आपल्या देशात गेल्या अनेक दिवसांपासून 5Gचा बोलबाला सुरु आहे. सर्व टेलेकॉम कंपन्यांच्या शर्यतीत Jio आणि Airtel सध्या अव्वल स्थानावर दिसत असले तरीही BSNL पुढच्या वर्षात 5G सेवा सुरु करून यामधला एक महत्वाचा दावेदार होण्याची शक्यता आहे. एकंदरीत टेलेकॉमच्या जगात असे स्पर्धात्मक वातावरण असताना आता वोडाफोन आणि आयडिया म्हणजेच VI या कंपनीने सुद्धा 5G सर्व्हीसीस सुरु केल्या आहेत (VI 5G Services). फास्ट स्पीड इंटरनेट हि आता काळाची गरज म्हणावी लागेल कारण हल्ली बहुतांश कामं हि इंटरनेटचा वापर करूनच पूर्ण होतात, तर सदर दृष्टीकोनातून VI या कंपनीचा नवीन निर्णय जाणून घेऊया..

जिओ आणि एअरटेल नंतर VI चं मोठं पाऊल: VI 5G Services

गेल्या वर्षीच ऑक्टोबर महिन्यात Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांकडून 5G सर्व्हीसीस देण्यास सुरुवात केली होती, संपूर्ण देशभरात 5G सेवा पोहोचवण्याचे उदिष्ट ठेऊन काम करत असताना एका वर्षानंतर VI म्हणजेच वोडाफोन आणि आयडिया या कंपनीने स्वतःच्या ग्राहकांसाठी 5G सर्व्हीसीसची सेवा उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. कंपनीकडून पुणे आणि दिल्ली या दोन्ही शहरांची प्राथमिक परीक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. कंपनीकडून या संधर्भात अधिकृत माहिती मिळालेली नसली तरीही त्यांच्या वेबसाईटवर या बाबतीत काही माहिती पाहायला मिळते.

देशाची राजधानी दिल्ली आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये VIची 5G सेवा (VI 5G Services) काही निवडक ठिकाणी लाइव करण्यात आली आहे आणि कंपनी याबद्दल अधिक माहिती देताना म्हणते कि 5G सेवेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 5G चे नवीन सीम कार्ड विकत घेण्याची गरज नाही तर तुम्ही जवळ असलेल्या 4G सीम कार्डचा वापर कायम ठेऊ शकता पण यासाठी तुमच्या हातात असलेला मोबाईल 5G सर्व्हीसीसनां सपोर्ट करणारा असला पाहिजे.

व्यापार वाढवण्यासाठी कंपनीने हे मोठं पाऊल उचललं आहे कारण कंपनीच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसते, गेल्या जुलै महिन्यात कंपनीच्या ग्राहकांची संख्या 22.8 कोटी होती. मात्र येणारा काळ हा कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने चांगला असू शकतो करण अलीकडेच उच्च न्यायालयाकडून कंपनीच्या बाजूने एक निर्णय देण्यात आला होता ज्यानंतर आयकर विभागाने VI कंपनीला 1128 कोटी रुपये परत केले होते.