Vi 5G Services: देशात लवकरच सुरु होणार Viची 5G सेवा; 3Gचे नाव कायमचे मिटणार?

Vi 5G Services: Vi चे ग्राहक आहात आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या नेटवर्कच्या त्रासाला कंटाळला आहेत का? तुमचं उत्तर हो असंच असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. Vi ही आपल्या देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे, आणि म्हणूनच या कंपनीच्या ग्राहकवर्गाचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकता. पण, समोर आलेली आनंदाची बातमी म्हणजे नेमकी काय आहे हे आज जाणून घेऊया…

Viच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी कोणती? (Vi 5G Services)

Vi ही टेलिकॉम कंपनी लवकरच देशात 5Gची सेवा सुरु करणार आहे, या यादीत नेहमीच जियो आणि एरटेल या कंपन्या अव्वल होत्याच आणि येत्या सहा ते सात महिन्यांमध्ये या यादीत Viचं नाव जोडलं जाणार आहे. आपल्या देशात या तीन अव्वल टेलिकॉम कंपन्या आता 5G सेवा देणार असल्याने नक्कीच या सर्वांमध्ये जबरदस्त टक्कर झालेली पाहायला मिळेल. आता येणारा काळ जरी टेलिकॉम क्षेत्रासाठी स्पर्धात्मक ठरणार असला तरीही याच कंपन्यांच्या ग्राहकांसाठी मात्र जोरदार इंटरनेटची सेवा उपलब्ध होणार आहे, आणि म्हणूनच ते फास्ट इंटरनेटच्या मदतीने सर्व महत्वाची कामं सुरळीतपणे पार पडू शकतील.

Vi कंपनीचे मुख्य कार्यकारी अक्षया मुंद्रा यांच्याकडून कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या घोषणेदरम्यान ही माहिती सर्वांसमोर ठेवण्यात आली होती(Vi 5G Services). कामापनीने त्यांच्या सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी काही उपाययोजना सुरु केल्या आहेत, यामध्ये प्रामुख्याने 3G सेवा महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मुंबई व कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बंद करण्यात येणार आहे. यानंतर कंपनी इतर शहरांमध्ये 3G सेवा टप्प्याटप्प्याने बंद करेल आणि आर्थिक वर्ष 2025 पर्यंत Viचे 3G नेटवर्क पूर्णपणे बंद होऊन जाईल.