आता Free मध्ये मिळवा Internet; फक्त ‘या’ नंबरवर मिस्ड कॉल करा

बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स Jio , BSNL , Airtel , VI यासारख्या टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी वेगवेगळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आणत असतात. हे प्लॅन्स बऱ्याचदा कमी किमतीत जास्त फायदा देणारे तर वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये उपलब्ध असतात. इतर क्षेत्राप्रमाणे टेलिकॉम क्षेत्रातही मोठी चुरस पाहायला मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंपन्या वेगवेगळे प्लॅन आपल्या ग्राहकांना ऑफर करत असतात. त्याच पार्श्वभूमीवर आता वोडाफोन आयडिया ने ग्राहकांसाठी सर्वात मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला फ्री मध्ये एक जीबी डेटा मिळू शकतो.

जिओ आणि VI कंपनी युजर साठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर आणत असतात. जिओ रिलायन्स कंपनी एअरटेल या टेलिकॉम कंपनीला टक्कर देत ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते. वोडाफोन आयडिया देखील आपले युजर्स वाढावे यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणत असते. एवढेच नाही तर या कंपन्यांकडून कमी किमतीमध्ये काही रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध असतात. या रिचार्ज प्लान चा वापर करून आपण त्या प्लॅनचा वापर करू शकतो.

VI ने आणलेल्या या नव्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल

1) सर्वात पहिले 121249 या नंबर वर कॉल करा.
2) त्यानंतर एक नंबर दाबा.
3) त्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये एक जीबी फ्री डेटा टाकण्यात येईल.
4) अशा प्रकारे तुम्हाला महिन्यातून दोनदा एक जीबी फ्री डेटा मिळवू शकतात.

काही दिवसांपूर्वी वोडाफोन आयडिया ने दोन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले होते. हा प्लॅन खास करून ज्या व्यक्तींना कमी वेळेसाठी जास्त डाटा ची गरज असते, अशा युजरसाठी हा प्लॅन महत्वपूर्ण आहे. या प्लॅनला super plan, super day हे नाव देण्यात आले आहे. जाणून घेऊया या दोन्ही प्लॅन बद्दल माहिती.

VI 24 रुपयेवाला डाटा प्लॅन

प्रिपेड युजर साठी असलेल्या या 24 रुपये वाल्या प्लॅनमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड इंटरनेट सेवा देण्यात येते. म्हणजे पूर्ण एक तास तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट देण्यात येते. हा प्लॅन हा एक सुपर हॉर्स प्लॅन आहे.

VI 49 रुपये वाला डाटा प्लॅन

प्रिपेड युजर साठी देण्यात आलेल्या 49 रुपयेवाल्या प्लॅनमध्ये 24 तासांसाठी 6GB हाय स्पीड 4G डेटा देण्यात येतो. या प्लॅनला सुपर डे प्लान देखील म्हटले जातात.