VI Recharge Plan : VI चा Jio पेक्षा 98 रुपये स्वस्त रिचार्ज प्लॅन; 90 GB Data, OTT सबस्क्रिप्शन अन बरंच काही

VI Recharge Plan। रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल, VI यासारख्या टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी वेगवेगळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आणत असतात. हे प्लॅन्स बऱ्याचदा कमी किमतीत जास्त फायदा देणारे तर वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये उपलब्ध असतात. जगातील इतर क्षेत्रांप्रमाणेच टेलिकॉम क्षेत्रात सुद्धा कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे दुसऱ्या कंपनी पेक्षा आपला रिचार्ज प्लॅन ग्राहक कसे घेतील याकडे सर्वच कंपन्या लक्ष देत असतात. त्याचाच भाग म्हणजे Vodafone-Idea ने Jio पेक्षा ९८ रुपये स्वस्त असा रिचार्ज प्लॅन आणला आहे.

VI चा 501 रुपयांचा Recharge Plan– (VI Recharge Plan)

वोडाफोन आयडिया युजर साठी एक खास प्लॅन घेऊन आला आहे. या महिनाभराच्या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सह 3000 फ्री एसएमएस मिळणार आहेत. या रिचार्ज प्लान मध्ये युजर्स ला 90 जीबी डेटा दिला जाणार असून या प्लॅनमध्ये 200GB रोलओवर डेटा बेनिफिट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर VI च्या या रिचार्ज प्लान मध्ये रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा चार्ज न करता फ्री मध्ये डाटा मिळू शकतो. त्याचबरोबर अमेझॉन प्राईम च्या 6 महिन्याच्या सबस्क्रीप्शन सह 1 वर्षासाठी डिज्नी, हॉटस्टार चा प्री एक्सेस देखील देण्यात येणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये (VI Recharge Plan) बारा महिन्यांसाठी सोनी लिव, vi movies and TV फ्री सबस्क्रिप्शन देखील देण्यात येणार आहे. या पोस्टपेड रिचार्ज प्लानची किंमत 501 आहे.

Jio चा 599 रुपयांचा Recharge Plan

रिलायन्स जिओ ने एक पोस्टपेड प्लॅन यूजर साठी आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून अनलिमिटेड डेटा ऑफर करण्यात येणार आहे. यासोबतच एलिजिबल सबस्क्राईबरला अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करण्यात येत आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये दिवसाला शंभर फ्री एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते . त्याचबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा सह जिओ क्लाऊड लाऊड चे फ्री स्क्रिप्शन देखील या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार आहे. या रिचार्ज प्लान ची किंमत 599 रुपये आहे. VI आणि Jio च्या दोन्ही रिचार्ज प्लॅनची तुलना करता आता तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी कोणता प्लॅन परवडणारा ठरेल.