Vi Recharge Plan : वोडाफोन आणि आयडिया (Vi) यांनी हातमिळवणी केल्यापासून अनेक लोकं त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. तसेच वेळोवेळी नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी Vi कंपनी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असते. आज आपण देखील कंपनीच्या कमीत कमी दारांत जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या काही ऑफर्स बद्दल जाणून घेऊया. सध्या Vi ही देशातली तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. आणि तिचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स काही खास सवलती सोबत घेऊन येत असतात. आज आम्ही तुम्हाला Vi च्या अशा एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमी पैशात ६ महिने रिचार्जचा आनंद घेता येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात…..
असा आहे Vi चा नवीन रिचार्ज प्लॅन : (Vi Recharge Plan)
Vi कंपनीकडून ग्राहकांसाठी आणलेल्या नवीन प्लॅनची वैधता सहा महिने अशी आहे.जास्तीत जास्त काळासाठी अनेक सुविधांचा वापर करून घेण्यासाठी हि ऑफर फारच चांगली आहे. केवळ 949 रुपयांमध्ये तुम्ही 180 दिवसांसाठी 12GB इंटरनेटचा वापर करू शकता, तसेच जर का काही कारणास्तव डेटा संपलाच तर त्वरित डेटा बूस्टरचा वापर करता येतो. लक्ष्यात घ्या कि 12GB डेटा संपल्यानंतर कंपनी तुमच्याकडून 50 पैसे प्रति MB असे शुल्क आकारायला सुरुवात करेल (Vi Recharge Plan).
सोबतच या प्लॅनमध्ये 1200 SMS ची सेवा मोफत मिळणार आहे. आजकाल आपण इंटरनेटचा जास्ती वापर करत असल्यामुळे मेसेंजरचा जास्ती वापर केला जात नाही. त्यामुळे या प्लॅनमध्ये मिळणारी हि मर्यादित सेवा तुमच्यासाठी पुरेशी ठरू शकते. मात्र मर्यादा जर का संपली तर इंटरनेट प्रमाणेच प्रति SMSवर 1 रुपयाचे शुल्क आकारले जाईल, आणि STD मेसेजसाठी यात 50 पैश्यांची वाढ केली जाईल. याशिवाय या प्लॅनमध्ये मुव्ही, टीव्ही शो इत्यादी मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घेत येतो.
हा जमाना ड्युअल सिमचा आहे, आपण काही एकाच सिमकार्डचा वापर करून व्यवहार करत नसतो. अनेकवेळा खासगी व्यवहार आणि कार्यालयीन कामासाठी दोन वेगवेगळ्या सिमकार्डसचा वापर केला जातो. मग अश्यावेळी हा प्लॅन (Vi Recharge Plan) सर्वात उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे वेळ न दवडता या प्लॅनविषयी अधिक माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळवा आणि सुविधांचा आनंद घ्या.