Vibrant Gujarat 2024 : गुजरातमध्ये उभे राहणार 26.33 लाख कोटींचे प्रकल्प; सर्वाधिक गुंतवणूकीचे क्षेत्र कोणते?

Vibrant Gujarat 2024: गुजरात मध्ये झालेला व्यापाऱ्यांचा सर्वात मोठा सोहळा म्हणजेच वायब्रंट गुजरात समिट, या व्यापारी परिषदेला अनेक मोठमोठाल्या कंपन्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. 3 दिवस चाललेल्या या परिषदेत भारतातील तसेच विदेशी कंपन्यांनी गुजरात मध्ये भर भक्कम गुंतवणुका करण्याच्या घोषणा केल्या आहेत. भारतातील प्रसिद्ध कंपन्यांबद्दल बोलायचं झाल्यास यात अदानी समूह, टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि DP World अश्या अनेक योद्योजकांचा समावेश होतो. या एकूण परिषदेत 41299 समंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. दिग्गज उद्योजकांनी दाखवलेल्या प्रतिसादावरून आता गुजरातमध्ये जवळपास 26.33 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तसेच या दरम्यान अधिकाधिक कंपन्यांनी हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

हरित ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक प्रतिसाद: (Vibrant Gujarat 2024)

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार वायब्रंट गुजरात या परिषदेत हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अनेक करार करण्यात आले. गेल्या वर्षीच्या परिषदेत कंपन्यांनी गुजरातमध्ये 18.87 लाख कोटी रुपयांच्या 57 हजार 241 प्रकल्पांसाठी करार मंजूर केले होते, मात्र 2021 मध्ये होणारी ही दरवर्षीची परिषद कोविडच्या संकटामुळे रद्द करण्यात आली. मात्र या दोन्ही वर्षांचे करार जर का उलगडून पाहिले तर आत्तापर्यंत गुजरातमध्ये सुमारे 45 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

ऊर्जा प्रकल्पांशिवाय वायब्रंट गुजरात (Vibrant Gujarat 2024) परिषदेत सेमीकंडक्टर (Semiconductor), मोबिलिटी (Mobility), ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या विविध क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये झालेल्या परिषदेत एकूण 35000 परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते, यामध्ये 34 भागीदार देश तर 16 भागीदार संस्था सामील झाल्या होत्या. वर्ष 2047 पर्यंत देशाच्या पंतप्रधानांना विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि त्यांच्या मतानुसार गुजरात मध्ये झालेली परिषद या दिशेने एक मोठा पाऊल ठरू शकते.

संपूर्ण परिषदेचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते व उद्घाटन सोहळ्यात यांनी जमलेल्या प्रेक्षकांसोबत चर्चा करीत असताना त्यांनी भारत लवकरच जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी खात्री व्यक्त केली होती . या परिषदेच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान आणि मोठमोठाला गुंतवणूकदारांशिवाय गृहमंत्री अमित शहा हे देखील सहभागी झाले होते.