Vibrant Gujarat Global Summit 2024 : अदानी- अंबानीसह प्रमुख उद्योगपती गुजरातमध्ये करणार लाखो-करोडोंची गुंतवणूक

Vibrant Gujarat Global Summit 2024: गुजरात साठी कालचा दिवस फारच महत्त्वाचा होता, कारण काल अनेक अब्जाधीशांनी गुजरात मध्ये झालेल्या वायब्रंट गुजरात 2024 या समिटमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. गुजरातमध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल सबमिटमध्ये जगभरातील अनेक देश सामील झाले होते आणि याच दरम्यान कित्येक ग्रुप्स आणि अब्जाधीशांनी वेगवेगळ्या गुंतवणुकीची घोषणा केली. या समिटमध्ये बोलत असता पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर संपूर्णपणे विश्वास दाखवत, भारतही येणाऱ्या काळात जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल याची शाश्वती दिली. गुजरातमध्ये झालेल्या याच ग्लोबल समिटमधे टाटा समूहापासून मारुती सुझुकीपर्यंत अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांनी गुंतवणुकीच्या घोषणा केल्या. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी दरम्यान गुजरातमध्ये दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मोठी घोषणा केली होती. आज जाणून घेऊया की व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी झालेल्या विविध अब्जाधीशांचा नेमका किती खजिना उलघडून दाखवला व त्यांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या..

१) मुकेश अंबानी: रिलायन्स ग्रुप :

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल सिमेंट 2024 मध्ये (Vibrant Gujarat Global Summit 2024) आशिया खंडातील सर्वात श्रीमंत माणसाने म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांनी पुढील दहा वर्षांसाठी गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. 2030 पर्यंत हेग आणि गुजरातच्या एकूण हरित ऊर्जेच्या वापरापैकी निम्मी ऊर्जा त्यांच्या कंपनीद्वारे उत्पादित केली जाईल अशी माहिती त्यांनी जाहीर केली. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार रिलायन्स जिओने जगभरातील सर्वात आक्रमक स्पीडने चालणार 5G प्रकल्प पूर्ण केला आहे. येणाऱ्या काळात रिलायन्स रिटेल देखील गुजरातमध्ये नवनवीन प्रॉडक्ट तयार करेल. रिलायन्स सध्या गुजरात मध्ये भारतातील सर्वात पहिला कार्बन फायबर प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.

२) गौतम अदानी: अदानी ग्रुप्स : Vibrant Gujarat Global Summit 2024

गौतम अदानी यांनी देखील गुजरातमध्ये भली मोठी गुंतवणूक करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अदानी पोर्ट ते अदानी पावर ग्रुप गुजरात मध्ये येत्या पाच वर्षांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करतील. त्यांच्या याच नवीन निर्णयामुळे राज्यात प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष प्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अदानी म्हणाले की आताच्या घडीला देखील त्यांनी गुजरातमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे, ज्यामुळे जवळपास 25 हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

३) एन चंद्रशेखरन: टाटा संच :

व्हायब्रंट गुजरात समिट 2024 मध्ये (Vibrant Gujarat Global Summit 2024) टाटा संचचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी देखील काही मोठ्या घोषणा केल्या. वर्ष 1939 मध्ये टाटा केमिकल्स या नावाने त्यांनी कंपनीची सुरुवात केली होती व आत्ता त्यांच्या एकूण 21 कंपन्या कार्यरत आहेत. एन चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा ग्रुप गुजरातमध्ये 50 हजार लोकांपेक्षा अधिकांना रोजगाराची संधी मिळवून देत आहे. येणाऱ्या काळात टाटा ग्रुप्स 20 गिगावॅटची लिथियम आयन बॅटरीची फॅक्टरी तयार करेल. यामुळे त्या भागातील EV सेक्टरला आणखीन मजबुती मिळण्यास मदत होणार आहे. सध्या त्यांना C295 रक्षा विमान तयार करायचे आहे. ही कंपनी गुजरात मधील ढोलेरा येथे सर्वात मोठा सेमीकंडक्टर फैब तयार करणार असून केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात स्किल इन्स्टिट्यूट देखील बनवणार आहे.

४) लक्ष्मी मित्तल: आर्सलर मित्तल :

आर्सलर मित्तल या कंपनीचे सीईओ आणि चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी व्हायब्रंट गुजरात (Vibrant Gujrat Global Summit 2024) मध्ये येणारी 20 वर्ष ही भारतासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असणार आहेत अशी माहिती दिली. चार वर्षांपूर्वीच त्यांच्या कंपनीने हाजीरा प्रोजेक्टची सुरुवात केली होती जो आता 2026 मध्ये पूर्ण होईल. या व्यतिरिक्त देखील कंपनीने अनेक प्रोजेक्ट सायन केल्याची माहिती त्यांनी दिली होती.

५) तोशीहिरो सुझुकी: मारुती सुझुकी :

मारुती सुझुकी ही आपल्या देशातील सर्वात मोठी कार निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीचे चेअरमन तोशीहिरो सुझुकी यांनी गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये काही प्रमुख गुंतवणुकीची घोषणा केली. त्यांच्या मतानुसार कंपनी गुजरात मध्ये लवकरच 35 हजार कोटी रुपयांचा एक नवीन प्लांट सुरू करणार आहेत. या प्लांटच्या अंतर्गत 2030- 31 या वर्षात त्यांना उत्पादन क्षमता 40 लाख युनिट पेक्षा अधिक प्रमाणात वाढवायची आहे.