Vijay Shankar Sharma: “पुढच्या पिढीसाठी आशिया खंडात नवीन संधी..”कारवाईनंतर पहिल्यांदाच काय म्हणाले शर्मा?

Vijay Shankar Sharma: Paytmचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आशा व्यक्त केली आहे की, भारतात यंदा त्यांच्या डिजिटल पेमेंट्सच्या व्यवसायासमोर असलेली आव्हानं लवकरच पार केली जातील आणि कंपनी अधिक मजबूत बनून पुनरागमन करेल. Paytm ला या आव्हानांमुळे गेल्या काही महिन्यांत मागे जावं लागलं होतं, पण शर्मा यांच्या म्हणण्यानुसार कंपनी या परिस्थितीशी लढत आहे आणि लवकरच मजबूत होऊन परत बाजारात प्रवेश करेल.

काय म्हणाले शर्मा? (Vijay Shankar Sharma)

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटलं आहे की, “कधी कधी आपल्या टीम आणि सल्लागदारांना सर्व काही समजू शकत नाही आणि अशा परिस्थितीत स्वतः पुढाकार घेणं आवश्यक असतं फक्त टीम किंवा सल्लागदारांवर अवलंबून राहून चालत नाही.” भारतीय Regulator ने Paytm च्या बँकिंग सहयोगी संस्थेवर काही कारवाई केल्यानंतर हा त्यांचे हे पहिला सार्वजनिक वक्तव्य आहे.

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा नुकत्याच झालेल्या काही अडचणींना तोंड देत असूनही आशिया खंडात Paytm ला आघाडीवर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. “आशिया खंडात पुढच्या पिढीसाठी आर्थिक व्यवस्था उभारण्याची संधी आहे,” असे शर्मा म्हणाले. “आपल्या आयुष्यात Paytmला आशियातील अग्रगण्य बनवायचे हे माझे स्वप्न आहे,” असा त्यांचा निर्धार आहे.

शर्मांना करायची आहे अडचणींवर मात:

पेटीएमPaytm चे मालक विजय शेखर शर्मा सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्यांच्या कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना, त्यांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. भारतातील बँकिंग नियंत्रकांनी पेमेंट्स बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत. ही बँक Paytmच्या अनेक आर्थिक सेवांचा पाया असल्यामुळे या निर्णयामुळे Paytm च्या सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. लक्ष्यात घ्या फेब्रुवारी महिन्यात याच निर्णयानंतर शर्मांनी (Vijay Shankar Sharma) पेमेंट्स बँकेच्या बोर्डातून राजीनामा दिला होता.