Vijay Shekhar Sharma: Paytm ला मोठा धक्का!! विजय शेखर शर्मा यांनी कंपनीला ठोकला रामराम

Vijay Shekhar Sharma: Paytm Payments Bank (PPBL) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्यातील वादामुळे PPBL सतत चर्चेत असते. या वादादरम्यान आज आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आलीये, ती म्हणजे Paytmचे CEO विजय शेखर शर्मा यांनी राजीनामा दिल्याची बातमी. Paytmची मूळ कंपनी One97 Communications (OCL) ने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी PPBLचे गैर-कार्यकारी अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य पद सोडले आहे. यासोबतच, PPBLच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात आल्याची माहितीही कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली.

कंपनीची नवीन रचना कशी असेल? (Vijay Shekhar Sharma)

Paytmने सोमवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, PPBL ने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, निवृत्त IAS अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि माजी IAS अधिकारी रजनी सेखरी सिब्बल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. याशिवाय, कंपनीच्या संचालक मंडळाचीही पुनर्रचना करण्यात आली आहे.

याशिवाय पंजाब आणि सिंध बँकेचे माजी कार्यकारी संचालक अरविंद कुमार जैन यांचा स्वतंत्र संचालक म्हणून आणि Paytm Payments Bankचे MD आणि CEO सुरिंदर चावला यांचाही बोर्डात समावेश केला गेला आहे. विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी PPBLच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याने PPBL नवीन अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुनर्गठित संचालक मंडळ PPBL च्या भविष्यातील व्यवसायाची देखरेख करेल.