Vijaypat Singhania : मुकेश अंबानीपेक्षाही श्रीमंत होते ‘हे’ उद्योगपती, आज बनलेत भाडेकरू

Vijaypat Singhania : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की स्वाभाविकपणे मुकेश अंबानी यांचाच नाव समोर येतं, पण तुम्हाला माहिती आहे का मुकेश अंबानी यांच्या आधी सुद्धा भारतीय बाजारात एका उद्योगपतीचा फारच मोठा बोलबाला होता. आज जी रेमंड कंपनी फारच चर्चेत असलेली पाहायला मिळते, त्याचं कारण म्हणजे उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांचे पत्नी यांच्यात चाललेले वादविवाद होय. आता हे वाद चार भिंतींच्या आत राहिलेले नसून अनेकांसाठी चर्चेचा विषय बनलेले आहेत. गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया खरंतर कंपनीचे मालक आहेत त्यांनी सर्व मुलाच्या नावावर केल्यामुळे त्यांना या व्यवसायातून काढता पाय घ्यावा लागला. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कुणा एके काळी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा सुद्धा श्रीमंत असलेले व्यक्ती स्वतः विजयपथ सिंघानिया आहेत…

मुलाच्या वागणुकीबद्दल काय म्हणाले विजयपत सिंघानिया? (Vijaypat Singhania)

नवाज मोदी सिंघानिया त्यांचे पती गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मारहाणीचे आरोप लावले असून त्यांच्याकडून संपत्ती मधला 75 टक्के वाटा देखील मागितला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजेच गौतम सिंघानिया यांचे वडील म्हणतात की हिंदू विवाह प्रमाणे जर का एखादं जोडपं घटस्फोट घेणार असेल तर पत्नीला पतीच्या संपत्ती मधला 50 टक्के वाटा दिला जातो, हे कायद्याच्या चौकटीत बसणारं गणित आहे. मात्र नवाज मोदी सिंघानिया या 75 टक्के वाटा मागत असल्यामुळे ही सरासर चूक आहे असे वक्तव्य विजयपथ सिंघानिया यांनी केले.

पुढे विजयपथ सिंघानिया म्हणतात की गौतम सिंघानिया हे कुठल्याही परिस्थितीत हार मानणार नाहीत, ते हुशार उद्योगपती आहेत, काही दिवसांपूर्वी हीच हुशारी वापरून वडिलांना देखीलचा रस्ता दाखवला होता. विजयपथ यांनी आपल्या सुनेला महत्वाची सूचना देखील केली आहे ते म्हणतात की नवाज मोदी यांच्याजवळ गौतम सिंघानिया (Vijaypat Singhania) यांच्याविरुद्ध लढण्यासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे वेळेतच माघार घ्यावी नाहीतर त्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागू शकतं.

सध्या विजयपथ सिंघानिया यांची परिस्थिती कशी आहे?

एकेकाळी सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयपथ सिंघानिया परिस्थिती आता बऱ्याच प्रमाणात बदललेली आहे. मुलाने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर सध्या ते भाडेकरू म्हणून जीवन व्यतीत करत आहेत (Vijaypat Singhania). सिंघानिया यांच्या हातात रेमंड कंपनी असताना तेच भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जात होते. कालांतराने त्यांनी आपली सर्व मालमत्ता मुलाच्या हातात सुपूर्त केली आणि त्यानंतर गौतम सिंघानिया यांनी आपले खरे रंग दाखवत, वडिलांनाच बाहेरचा रस्ता दाखवला, त्यामुळे आता त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.