Vineeta Singh Story : एकेकाळी 1 कोटीची संधी सोडली; आज उभारला 500 कोटींचा व्यवसाय

Vineeta Singh Story : अपयशातून शिकणारा माणूसच नेहमी यश मिळवू शकतो. अनेकवेळा काय होतं कि प्रयत्न करताना लगेचच यश हाती लागत नाही, आणि मग कित्येक लोकं परिस्थितीसमोर हार मनात प्रयत्न सोडतात. पण काही मेहनती आणि जिद्दी लोकं शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत आणि एक न एक दिवस नक्कीच यश त्यांना शोधात मागोमाग येतं. आजची गोष्ट आहे अश्याच एका उद्योगपती महिलेची आहे. शार्क टेंक इंडियामध्ये तुम्ही यांना पाहिलं असेलच आणि खास करून महिलावर्गाने शुगर या कंपनीचं नाव ऐकलंच असेल. तर जाणून घेऊया हि सर्वपरिचित कंपनी उभी करणाऱ्या माहिलेची गोष्ट.. विनिता सिंग असं त्यांचे नाव असून आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

1 कोटीची संधी धुडकावून घेतला मोठा निर्णय – Vineeta Singh Story

वर्ष 1983 मध्ये गुजरातमध्ये विनिता सिंघ (Vineeta Singh Story) यांचा जन्म झाला. त्यांची आई Phd धारक आहे व वडील AIIMS मध्ये बायोफिजीस्ट म्हणून काम करत होते. त्याचं सुरूवातीचं शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून झालं आहे. यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या IIT व IIM चा भाग बनल्या. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे वयाच्या केवळ 23 व्या वर्षी त्यांना इंवेस्टमेंट बँकमध्ये 1 कोटी रुपयांची संधी देण्यात आली होती. मात्र हि संधी धूडकारत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. कधीही निर्णय घेणं फारच सोपं असत परंतु कठीण काम असत तो निर्णय निभावणे…… विनिता सिंघ यांनी घेतलेला निर्णय निभावण्यासाठी अनेक कष्टांचा सामना करावा लागला. मात्र कधीच खचून न जाता त्यांनी आपला प्रवास कायम ठेवला आणि वर्ष 2015 मध्ये त्यांनी शुगर कोस्मेटीक्स या कंपनीची सुरुवात केली.

500 कोटी रुपयांची शुगर कोस्मेटीक्स:

आज शुगर कोस्मेटीक्सचा व्यवसाय घराघरात पोहोचलेला आहे. महिलावर्ग तर या प्रोडक्टचा चाहता बनला आहे. आज हि कंपनी 130 पेक्षा जास्ती आउटलेट्स सांभाळते आणि कंपनीची उलाढाल 500 कोटी रुपयांच्या घरात सहज जाते. आपले प्रोडक्ट सर्वसामान्य माणसापर्यंत महिनापर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी सोशल मिडियाचा वापर केलाच पण सोबतच स्थानिक स्टोर्समध्ये जाऊन सुद्धा या वस्तूंबद्दल माहिती दिली. केवळ 7 वर्षापूर्वी सुरु झालेली हि कंपनी आज बाजारात नाव कमवते आणि यामागे विनिता सिंघ (Vineeta Singh Story) आणि त्यांचे पती कौशिक मुखर्जी यांची मेहनत आहे.