Virat Kohli Net Worth : आत्ताच्या घडीला भारतीय क्रिकेट संघातील सर्वात मोठा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने काल 49 वे शतक जोडून क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडूलकर सोबत बरोबरी केली आहे. सध्याच्या विश्वचषकात भारतीय संघ कमालीची कामगिरी करत आहे आणि यात विराट कोहली हा महत्वाचा हिरो ठरत आहे. काल विराट कोहली याने 35 व्या वर्षात पदार्पण करताना एक नवीन विक्रम करून दाखवला. पण या हरहुन्नरी खेळाडूची नेट वर्थ तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर हे आर्टिकल नक्कीच वाचा कारण हा आकडा वाचून तुम्ही नक्कीच चकित व्हाल…
विराट कोहली आहे एवढा श्रीमंत: Virat Kohli Net Worth
विराट कोहली हा क्रिकेटपटू असण्यासोबतच सोशल मियावर विविध ब्रेन्डसचे प्रमोशन करतो. असं म्हणतात कि मैदानात एकटा कोहली उभा असेल तरीही त्याच्या बेटमधून फक्त रन्सचा पाऊस पडत असतो. असे कित्येक सामने आहेत जिथे विराट कोहलीने स्वतः खंबीरपणे भारतीय संघाला विजय मिळवून दिलं आहे. काल म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी 35 वर्ष्यांचा झालाय. विराट कोहली जेवढी कमाई क्रिकेट मधून करतो त्याच दर्ज्याची कमाई एडवरटाइस, ब्रेन्ड प्रमोशन मधून करतो. या व्यतिरिक्त विराट कोहली याची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक देखील आहे. विराट कोहलीची एकूण नेट वर्थ 127 मिलियन डॉलर्स आहे.
वर्षाला कमावतो 15 कोटी रुपये:
किंग कोहली म्हणून ओळखला जाणारा विराट खऱ्या आयुष्यात देखील राजाच आहे कारण तो वर्षाला 1500 कोटी रुपयांपर्यंत (Virat Kohli Net Worth) सहज पैसे कमावतो. BCCIचा तो A+ दर्जाचा खेळाडू असल्यामुळे त्याला वार्षिक 7 कोटी रुपयांचे मानधन दिले जाते. विराट कोहली 1,25,00,000 एवढी मोठी रक्कम कमावतो. आणि केवळ एकाच दिवसाची कमाई जर का तुम्ही ऐकलीत तर मात्र तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल, कारण हा आकडा छोटा मोठा नसून 5,76,923 रुपयांच्या आसपास आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये विराट कोहली 100 व्या स्थानावर आहे.