Virushka Net Worth : विराट- अनुष्कामध्ये सर्वात श्रीमंत कोण? कोणाची कमाई आहे जास्त?

Virushka Net Worth : भारताचा स्टार क्रिकेटपटू, रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी यांच्या लग्नाला काल-परवाच 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटांच्या दुनियेत अनुष्का शर्माला न ओळखणारा क्वचितच कुणीतरी असेल, तर क्रिकेटपटू विराट कोहली याच्याबद्दल काही वेगळं बोलायची गरजच नाही, कारण क्रिकेट विश्वाच्या बाहेर रमणाऱ्या एखाद्याला जरी विचारलं कि, “विराट कोहली हि नाव ऐकलं आहे का?” तर त्याचं उत्तर नक्कीच हो असंच येईल. विराट आणि अनुष्का यांची जोडी सर्वचजण पसंत करतात आणि म्हणून त्यांना चाहत्यांकडून “Virushka” असं एक खास नाव देण्यात आलंय. पण कधी विचार केला आहेत का कि Virushkaची हि जोडी नेमका किती पैसे कमावत असेल? मैदानात एकामागून एक शतक मारणाऱ्या विराट कोहलीची एकूण संपत्ती किती आहे याचा आज थोडा अंदाज घेऊया…

Virushka जगतात असं आयुष्य:

विराट आणि अनुष्का हे दोघे त्यांच्या क्षेत्रामधले दिग्गज असल्यामुळे त्यांची कमाई सुद्धा लाखो आणि करोडोंच्या घरातली असते (Virushka Net Worth). ते एक लोकप्रिय सेलिब्रेटी जोडपं आहे, त्यांच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या घडामोडी सुरु असतात हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. वर्ष 2017 मध्ये लग्नगाठ बांधलेल्या विराट आणि अनुष्काने सोबत 6 वर्ष संसार केला आहे. अनेकवेळा विराट कोहलीला आपण त्यांच्या कृतीमधून भल्यामोठ्या जनसमूहासमोर प्रेम व्यक्त करताना पाहिलंय. अनुष्का देखील नेहमीच विराटच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे त्यामुळे Virushka यांच्याकडे आजकालची तरुण पिढी आदर्श जोडी म्हणूनच पाहते. विराट कोहली हा तर करोडपती आहेच पण त्याची पत्नी देखील बॉलीवूडमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

Virushka ची एकूण संपत्ती किती? (Virushka Net Worth)

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का शर्मा सध्या 35 मिलियन डॉलर्सची मालकीण आहे, म्हणजेच तिच्याजवळ 255 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बॉलीवूडमधला एक सुंदर आणि निरागस चेहरा म्हणून अनुष्का ओळखली जाते, त्याच बरोबरच तिने जपलेली माणुसकी आणि तिचा प्रेमळ स्वभाव यांमुळे ती सर्वांची चाहती बनली आहे. मुंबईमध्ये स्वतःचं घर असलेली अनुष्का शर्मा महिन्याला 1 कोटी रुपयांची कमाई करते. BMW, Range Rover आणि Mercedes या गाड्या पाहता अनुष्काच्या संपत्तीचा अंदाज येतो (Virushka Net Worth).

तर दुसरीकडे क्रिकेटचा किंग विराट कोहली हा तर करोडोंचा मालक आहे. त्याची एकूण संपत्ती 127 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1046 कोटींच्या घरात आहे. क्रिकेट व्यतिरिक्त तो अनेक ब्रॅण्ड्सचा अँम्बेसेडर आहे आणि सोबतच वन8कम्यून नावाचं प्रसिद्ध रेस्टोरंट देखील चालवतो. विराट आणि अनुष्का यांच्या संपत्तीची सांगड घातली तर हा आकडा 1301 कोटी रुपयांपर्यंत जाईल.