Vivek Bindra Case : मागच्या काही दिवसांपासून प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरु आहेत. संदीप महेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर काही गंभीर लावले आहेत, आरोपांमध्ये महेश्वरी यांनी बिंद्रा यांच्यावर मल्टी लेव्हल मार्केटिंग करीत असल्याचे आरोप लावले आहेत. विवेक बिंद्रा यांनी एकूण 500 कोटी रुपयांचा स्कॅम केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलाय. सध्या संदीप माहेश्वरी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाला गती देण्याचा विचार करत असतानाच सर्व प्रकारामध्ये महेश्वरी पेरी यांनी विशेष भूमिका निभवायला सुरुवात केली आहे. पण आता हे महेश्वरी पेरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असले, तर जाणून घेऊया नेमकं काय आहे एकूण प्रकरण?
कोण आहेत महेश्वरी पेरी? (Vivek Bindra Case)
महेश्वरी पेरी हे करियर 360 चे फाउंडर आणि चेअरमन आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी IIPM आणि अरिंधम चौधरी यांना कोर्ट कचेरीत खेचले होते आणि हा संपूर्ण खटला एकट्याने जिंकला होता. विशेष म्हणजेच महेश्वर पेरी हे पब्लिक लिटिगेशन केसीसमुळे सगळीकडे ओळखले जातात. आता विवेक बिंद्रा यांच्या प्रकरणात पेरी यांची इंट्री झाल्यामुळे नक्कीच ते हे प्रकरण कोर्ट पर्यंत घेऊन जाणार अश्या चर्चा सगळीकडे सुरु आहेत. संदीप महेश्वरी यांच्यानंतर पेरी यांनी देखील विवेक बिंद्रा यांच्या विरोधात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विवेक बिंद्रा हे नेमक्या कोणत्या बेसिसवर मुलांना धडे देत आहेत? या सगळ्यातून ते किती पैसे कमावतात? अश्या प्रकारचे प्रश्न उभे करायला सुरुवात केल्याने सर्व प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बिंद्राचा कोर्स मल्टीलेव्हल स्कॅम का?
MBA कोर्स आणि IBC बिजनेस मॉडेल यांबद्दल एका प्रोग्रॅम मांडून बिंद्रा कोर्स ऑफर करतात ज्यांमध्ये जवळपास 50 हजार रुपये एवढी फी आकारली जाते. केवळ हा कोर्स केल्याने कोणताही माणूस 10 लाख ते 20 कमाई करू शकतो असा दावा बिंद्रा यांनी केला आहे, मात्र कंपनी मुलांच्या माध्यमातून मोठा सेल करत असल्याचा आरोप पेरी आणि इतर मंडळींनी केला आहे (Vivek Bindra Case). यांमधूनच बिंद्रा यांनी वर्ष 2022-23 मध्ये 308 कोटी रुपयांची कमाई केल्याचा आरोप पेरी यांनी लावला आहे. बिंद्रा यांची जवळपास 74 टक्के रक्कम हि नॉन रिफंडबल आहे असा दावा करत पेरी त्यांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत.