Vodafone and Idea: “Vi कंपनीमधली हिस्सेदारी विकणार नाही”; सरकारचा निर्णय पक्का

Vodafone and Idea: सरकारी मालकी असलेल्या वोडाफोन आयडिया(Vi) कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांत चांगली वाढ झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन सरकार शेअर्स विकून भरघोस रक्कम मिळवू शकले असते तरीही सरकारने असा निर्णय घेतला नाही, त्याऐवजी कंपनी 27 फेब्रुवारी रोजी निधी उभारणीसाठी अंतिम पावले टाकत असताना सरकारने 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स धारण करून सर्वात मोठा भागीदार बनून राहण्याचा निर्णय घेतला.

Vodafone and Idea मध्ये सरकारची भागेदारी सर्वात मोठी:

सरकार सध्या कंपनीमधील आपला वाटा विकण्याच्या (Divestment) विचारात नाही कारण या पैशांचा वापर 5G सेवा सुरु करण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी केला जाणार आहे. किंवा “सरकार कंपनीमध्ये आपली गुंतवणूक (Holding) काढून टाकण्याचा विचार करत नाही,” असे सूत्रांनी सांगितले. भविष्यात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, परंतु आत्तासाठी अश्या कुठल्याही प्रकारच्या बाबतीत विचार करण्याची सरकारची धारणा नाही.

वोडाफोन आयडिया(Vi) कंपनीवर जवळपास 2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ती मोठ्या तोट्यात चालली आहे. मात्र, गेल्या वर्षात सरकारने कंपनीच्या भविष्यातील व्याज थकबाकीची रक्कम आपल्या वाट्यात घेऊन कंपनीमध्ये हिस्सा घेण्याचा निर्णय घेतला होता(Vodafone and Idea) त्यामुळे, गेल्या वर्षात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 150 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.