Vodafone Idea 5G Services: Jio आणि Vodafone -Idea या आपल्या देशातील नामांकित अशा दोन टेलिकॉम कंपन्या आहेत. आजही आपल्या देशात या दोन कंपन्या त्यांच्या भल्या मोठ्या ग्राहक वर्गासाठी ओळखल्या जातात. हाच ग्राहक वर्ग टिकवण्यासाठी आणि बाजारातले आपले स्थान कायम ठेवण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून विविध प्रकारच्या योजना तयार केल्या जातात. सध्या आपण तांत्रिकदृष्ट्या दिवसेंदिवस प्रगती करत आहोत, आणि म्हणूनच वोडाफोन(Vi) या कंपन्यांनी आता 5G सर्विसेस द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही जर का वोडाफोन टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी आहे, या बातमीतून तुम्हाला एक खास माहिती मिळणार असल्याने ही बातमी सविस्तर वाचा. कारण Vi या कंपनीने आपल्या 5G प्लॅन्सची घोषणा केली असून यासाठी त्यांच्या ग्राहकांना वेगळं किंवा नवीन सिमकार्ड खरेदी करण्याची गरज राहिलेली नाही.
Vi सुरू करतेय 5G सर्विसेस: (Vodafone Idea 5G Services)
देशात जिओ(Jio) आणि एअरटेल(Airtel) यांच्यानंतर वोडाफोन-आयडिया(Vi) ही कंपनी देखील 5G सर्विसेस सुरू करणार आहे. ही माहिती स्वतः कंपनीने त्यांच्या अधिकृत साईटचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचवली होती. कंपनीकडून आता जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांनी आता आपले 5G रिचार्ज प्लॅन्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. पण लक्षात घ्या की जियो आणि एअरटेल यांच्याप्रमाणे वोडाफोन आणि आयडियाच्या वापरकर्त्यांना 5G सर्विसेसचा वापर करून घेण्यासाठी नवीन सिम कार्ड विकत घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्याजवळ केवळ 5G ला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. त्यामुळे 4G सिम कार्डचा वापर करून देखील तुम्ही 5G च्या सर्विसेस मिळवू शकता.
कंपनीने अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि दिल्ली शहरातील काही निवडक ठिकाणी आता कंपनी 5G सर्विसेस पोहोचवणार आहे. जेणेकरून या ठिकाणी वावरणाऱ्या कंपनीच्या ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेटचा वापर करण्याची संधी मिळेल (Vodafone Idea 5G Services). मात्र दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधली ही विशेष ठिकाणं कोणती असतील याबद्दल अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही.
असे असतील कंपनीचे रिचार्ज प्लॅन्स:
वोडाफोन आणि आयडिया (Vi) यांनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन्सची घोषणा केली आहे, जर का तुमच्याकडे व्हीआय(Vi) प्रीपेड सिम कार्ड असेल तर कंपनीच्या 5G स्पीडचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 478 रुपयांचा प्लॅन विकत घ्यावा लागेल, तसेच जर का तुम्ही वोडाफोन आणि आयडियाच्या पोस्टपेड सिम कार्ड चा वापर करत असाल तर तुम्हाला 5G सर्विसेस मिळवण्यासाठी REDX 1101 रुपयांचा प्लॅन विकत घ्यावा लागेल(Vodafone Idea 5G Services). लक्षात घ्या की 5G सर्विसेस चा फायदा मिळवण्यासाठी तुमचा नंबर दिल्ली किंवा महाराष्ट्रात रजिस्टर असणे महत्त्वाचे आहे.