Vodafone Idea: Vi ने केलेल्या ‘या’ मोठया बदलाबद्दल जाणून घेतलंत का? तुमच्या खिश्यावर होऊ शकतो परिणाम

Vodafone Idea: तुम्ही देखील Vi चे ग्राहक आहात का? कारण हि टेलिकॉम कंपनी देखील आताच्या घडीला यशस्वी बनली असल्याने तिचा ग्राहक वर्ग मोठा असण्यात कोणतेही दुमत नाही. आता ही बातमी महत्वाची का? याबद्दल जाणून घेऊया. कंपनीने बिल पेमेंट्सच्या बाबतीत काही बदल केल्याबद्दल चर्चा सुरु असल्याने अनेक वोडाफोन आइडिया ग्राहक सोशल मीडियावर बिल पेमेंटच्या नियमांमधील बदलाबांबद्दल प्रश्न विचारत आहेत. लक्ष्यात घ्या कंपनीने ग्राहकांसाठी बिल भरण्याच्या नियमांमध्ये थोडा बदल केला आहे. आधी, वोडाफोन आइडियाच्या ग्राहकांना 15 दिवसांत बिल भरण्याची सुविधा होती, परंतु आता कंपनी बिल भरण्यासाठी कमी वेळ देणार आहे.

Vi कंपनीने बदलला बिल भरण्याचा कालावधी? (Vodafone Idea)

आता Vi या टेलिकॉम कंपनीकडून तुम्हाला बिल भरण्यासाठी 15 दिवसांऐवजी 10 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे आणि जर तुम्ही वेळेत बिल भरले नाही तर त्या बदल्यात तुम्हाला दंड भरावा लागेल आणि म्हणूनच ही बातमी सर्व ग्राहकांसाठी महत्वाची आहे. वोडाफोन आइडिया कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे आणि पैसे जमा करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे, म्हणूनच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुम्हाला कसं कळेल की तुमचं बिल भरायचं आहे?

कंपनीकडून तुम्हाला SMS आणि ईमेलद्वारे बिल भरण्याची आठवण करून दिली जाईल किंवा या तांत्रिक जगात तुम्ही My Vodafone Idea App द्वारेही तुमचं बिल तपासू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही Vodafone Idea च्या वेबसाइटला भेट देऊ शकता तसेच 199 वर कॉल करू शकता. कायम लक्ष्यात ठेवा की आत्ताच्या घडीला एक नाही तर अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेच्या मोबाइल बँकिंग एपद्वारे तुमचे बिल भरू शकता किंवा UPI हा देखील एक उत्तम पर्याय आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या जवळच्या वोडाफोन आइडिया स्टोअरवर जाऊन तुमचे बिल भरण्याची सोया आजही उपलब्ध आहे (Vodafone Idea).