Vodafone-Idea News: आर्थिक अडचणीत सापडलेली दूरसंचार कंपनी Vi आता 45 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असून यासाठी कंपनी शेअर आणि कर्ज रोख्यांचा वापर करणार आहे. यातील 20 हजार कोटी रुपये शेअर आणि संबंधित पर्यायांद्वारे उभारले जातील आणि या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे आणि कंपनीचे प्रवर्तकदेखील यात सहभागी होणार आहेत.
कंपनीच्या अडचणी संपेनात: (Vodafone-Idea News)
व्होडाफोन आयडिया, भारतातील एक प्रमुख दूरसंचार कंपनी सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. 2.1 लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोझ्याखाली दबलेली कंपनी, ग्राहक गमावत आहे. या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, कंपनीच्या संचालक मंडळाने 20 हजार कोटी रुपये उभारण्यासाठी बँकर आणि इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मंजुरी दिली आहे.
कंपनी 2 एप्रिल 2024 रोजी भागधारकांची बैठक बोलावणार आहे (Vodafone-Idea News). या बैठकीत निधी उभारणीला मंजुरी मिळाल्यास, कंपनी तिमाहीत निधी उभारणी पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, कंपनी कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या कंपनीचे बँकांकडून घेतलेले कर्ज 4,500 कोटींपेक्षा कमी आहे. शेअर आणि कर्जाद्वारे उभारण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग कंपनी 4G Coverage, 5G Network आणि क्षमता विस्तारासाठी लक्षणीय गुंतवणूक करण्यासाठी करेल, यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल असे कंपनीने म्हटले आहे.