Wedding Season In India: प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असत कि त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लग्न हा जय्यत तयारीत आणि धूम धडाक्यात साजरा व्हावा. आणि असे वाटण्यात काहीही गैर नाही. आता देशभरात लग्नाचा हंगाम सुरु झालाय आणि प्रत्येक लग्न ठरलेला माणूस हा कायम स्वरूपी आठवण राहणारा हा दिवस अजून जास्ती खास कसा बनवता येईल याच विचारात असेल. एखादं लग्न जर का आलेल्या सर्वच्या लक्ष्यात रहाव असं व्हायला हवं असेल तर सर्वात महत्वाच घटक असतो तो म्हणजे डेस्टीनेशन…. तुम्ही कुठे लग्न करणार आहात ती जागा. आजच्या तरुण पिढीच्या मनात तर याच डेस्टीनेशन लग्नाचा क्रेज जरा जास्तीच आहे. आणि विदेशात जाऊन सुद्धा पार पडणाऱ्या अश्या अनेक भल्यामोठ्या लग्न समारंभाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
डेस्टीनेशन लग्न करण्याचं प्रमाण वाढलं: (Wedding Season In India)
आजकाल तरुणांना मोठ मोठाली लग्न आणि ग्रँड सेलेब्रेशन म्हणजेच लग्न असं वाटत आहे आणि कुठेतरी यामुळे लग्न समारंभाची मूळ संकल्पना हरवत चालेली पाहायला मिळते . सिनेसृष्टीतल्या अभिनेत्यांनी आणि इतर प्रसिद्ध व्यक्तींनी लाऊन दिलेली लग्न पहिली कि आपल्याही मनात इच्छा निर्माण होते कि काही अंशी अश्याच प्रकारे आपणही लग्न थाटावं. देशात चर्चेत असेलेल्या वेडिंग डेसटीनेशन पैकी प्रसिद्ध म्हणजे गोवा, राजस्थान,केरळ,मुंबई हि उल्लेखनीय ठिकाणं आहेत. आणि लग्न समारंभाच्या काळात या राज्यांना भलामोठा आर्थिक फायदा होत असतो (Wedding Season In India).
परदेशात जाऊनही करतात लग्न:
केवळ देशाच्या चौकटीतच नाही तर परदेशात जाऊन लग्न करण्याचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालेलं आहे. दुबई, मस्कट, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया या ठिकाणी लग्नाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात डेसटीनेशन बुकिंगच्या व्यवहाराला उधाण आलेलं दिसत, या नवीन संकल्पनेला सुरुवात झाली ती सेलिब्रेटी वेडिंगमुळे. यात खास करून अनुष्का आणि विराट कोहली, दीपिका आणि रणवीर सिंघ, कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा तसेच कतरिना आणि विकी कौशल या जोडप्यांचा समावेश होतो.
कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे जनरल सेक्रेटरी सांगतात कि दर वर्षी जवळपास 5000 लग्न हि परदेशात संपन्न होतात आणि ज्यांवर 50,000 कोटी रुपयांपर्यंत पैसा खर्च केला जातो. यावर्षी देशात एकूण 38 लाख लग्न समारंभ पार पडण्याची शक्यता आहे, ज्यांमुळे बाजारात 4.7 लाख कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते (Wedding Season In India). प्रवीण खंडेनवाला असेही म्हणाले कि जर का सर्व लग्न भारतात संपन्न झाली तर देशाच्या पैसा देशाबाहेर जाणार नाही आणि देशाची अर्थव्यवस्था यामुळे सुधारायला मदत मिळेल तसेच स्थानिकांना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.