Wedding Season In India : सनईच्या सुरांमुळे बाजाराला होणार 4.7 लाख कोटी रुपयांचा फायदा

Wedding Season In India: प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लग्न. जमलेल्या पाहुण्यांसाठी लग्न हा जरी नात्यातल्या माणसांना भेटण्याचा किंवा नव दाम्पत्याला शुभेच्छा देण्याचा दिवस असला तरीही लग्न होणाऱ्या वधू वरासाठी आणि त्यांच्या परीवारांसाठी खरोखरच हा दिवस म्हणजे डोक्यावर असलेली एक टांगती तलवार असते. नवीन नाती जोडणं सोपं असलं तरीही आयुष्यभर ती निभावता आली पाहिजेत आणि स्वीकारलेल्या नात्याची योग्य पद्धतीने संभाळलेली धुरा म्हणजे संसार होय. आता लग्नसराई सुरु होईल, अनेकांच्या घरातून सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येतील आणि सोबताच भारतीय बाजारात 4.7 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.

लगीनघाईत वाढणार बाजारी उलाढाल:(Wedding Season In India)

मागच्या अनेक दिवसांपासून मुहूर्ताच्या अभावी अडकून राहिलेले विवाह आता एका दमात सुरु होणार आहेत. यासाठी नोव्हेंबरमध्ये 23,24,27,28,29 या तारखांना लग्नकार्याचे मुहूर्त असणार आहेत तर डिसेंबर महिन्यात 3,4,7,8,9 आणि 15 अश्या तारखा लग्नकार्यासाठी शुभ असणार आहेत. कान्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders) म्हणजेच CAT या व्यापारी संघटनेला अशा आहे कि 23 तारखेपासून सुरु होणाऱ्या या लग्नसराईत एकूण 38 लाख विवाह संपन्न होऊ शकतात आणि याचा याचा मोठा फायदा भारतीय बाजारपेठेला होणार आहे, बाजारपेठेत यावेळी 4.7 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला जाईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

CAT च्या म्हणण्यानुसार गेल्यावर्षीपेक्षा यंदा बाजाराला 1 लाख कोटी रुपयांचा अधिक फायदा होऊ शकतो. हे आकडे मांडण्यासाठी त्यांनी देशातील विविध राज्यांमधल्या प्रमुख 30 शहरांचा आढावा घेतला आहे. गेल्यावर्षी देशात 32 लाख लग्न समारंभ पार पडले होते(Wedding Season In India) आणि बाजाराला एकूण 3.75 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता. त्यामुळे यंदाचे आकडे पाहता या लग्नाच्या मौसमात अर्थव्यवस्थेला भलामोठा फायदा होऊ शकतो.