ITR भरण्यासाठी कोण- कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? चला जाणून घेऊया

बिझनेसनामा । प्रत्येक नागरिकाला इन्कम टॅक्स भरणे अनिवार्य असते हे तर आपल्यातील प्रत्येकालाच ठाऊक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स भरण्यासाठी आता सरकारने ऑनलाईन सुविधा देखील सुरु केली आहे. त्याच प्रमाणे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने देखील इन्कम टॅक्स भरता येतो.मात्र ITR भरताना आपल्याला काही कागदपत्रांची गरज भासेल. तसेच या कागदपत्रांबरोबरच आपल्याला फॉर्म देखील भरावा लागेल. ई-फायलिंग पोर्टलवर ITR ऑनलाइन भरताना ITR फॉर्म-1 आणि ITR फॉर्म-4 या दोनपैकी कोणताही एक फॉर्म निवडण्याचा पर्याय दिला जातो. या दोन फॉर्म पैकी आपल्याला एकाची निवड करावी लागेल.

हे लक्षात घ्या कि, बहुतेक करदात्यांकडून ITR फॉर्म-1 चा वापर करून टॅक्स भरला जातो. या फॉर्ममधील बहुतांश माहिती आधीपासूनच भरली गेलेली असते जी करदात्याला व्हेरिफाय करावी लागते. तसेच याव्यतिरिक्त काही चुकीची माहिती दिली गेली असेल तर ती दुरुस्त देखील करावी लागेल.

ITR साठी द्यावी लागतात ‘ही’ कागदपत्रे

हे लक्षात घ्या कि, ई-फायलिंग पोर्टलवर ITR दाखल करण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक अकाउंट डिटेल्स, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स तसेच इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर ITR फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डही लिंक असायला हवे. तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे करदात्याचा ई-मेल आयडी देखील रजिस्टर्ड केलेला असला पाहिजे.

ITR-1 फॉर्म कोणा-कोणाला भरता येईल ???

ज्या लोकांचे पगार, मालमत्ता, व्याज आणि शेतीद्वारे मिळणारे उत्पन्न यासहीत एकूण उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे त्यांना हा फॉर्म भरावा लागेल. यासोबतच यामध्ये पगारातून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न, लाभांशातून मिळणारे उत्पन्न याची माहिती देखील जाहीर करावी लागेल.

ITR फॉर्म-4 कोणा-कोणाला भरता येईल ???

जर आपण पर्सनल, HUF आणि फर्म (LLP व्यतिरिक्त) असाल आणि आपले वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि आपले उत्पन्न कलम 44AD, 44ADA किंवा 44AE मधील कॅल्क्युलेशन नुसार प्रोफेशन आणि व्यवसायातून असेल तर आपल्याला ITR फॉर्म-4 निवडून आयटीआर भरावा लागेल.