बिझनेसनामा । शेअर बाजार (Stock Market) हा गुंतवणुकीच्या अनेक पर्यांयापैकी एक आहे. शेअर बाजाराद्वारे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे (Earn Money) कमावता येतात. मात्र यासाठी गुंतवणूकदाराकडे संयम असणे महत्वाचे आहे. शेअर बाजारामध्ये तोच गुंतवणूकदार यश मिळवतो जो संयम बाळगतो. गुंतवणूक करण्याआधी आपण शेअर बाजारातील लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांबाबतची माहिती घ्यायला हवी.
कॅपच्या आधारे विभागलेल्या या कंपन्यांची मार्केट कॅप वेगवेगळी असते. ज्या कंपन्यांची मार्केट कॅप 5000 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना स्मॉल कॅप कंपन्या (Small Cap Company) असे म्हंटले जाते. शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदार स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुक करतात, कारण त्यांच्यामध्ये वाढ होण्याची जास्त क्षमता असते.
मात्र स्मॉलकॅप कंपन्यांकडे जास्त रिटर्न देण्याची क्षमता असली तरीही त्यामध्ये जोखीमही तितकीच आहे. अशातच गोष्टी सुरळीत न झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसानही सोसावे लागू शकते. त्यामुळे स्मॉल कॅप श्रेणीतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
जोखीम जितकी जास्त तितकीच रिटर्नची क्षमता जास्त –
प्रत्येक कंपनीची सुरुवात ही खालच्या पातळीपासून सुरू होऊन एका विशिष्ट उंचीवर पोहोचली जाते. मात्र यासाठी कंपनीचा दृष्टिकोन, त्यांचे बिझनेस मॉडेल, तसेच भविष्यातील संभावना आणि प्रमोटर्सचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. तसेच या सर्व गोष्टींसाठी कंपनीच्या मूलभूत गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचे विश्लेषण करणे महत्वाचे ठरेल.
स्मॉल-कॅप फंड गुंतवणुकीचा चांगला पर्याय –
स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये वाढीची शक्यता खूप जास्त असल्याने गुंतवणूकदारांसोबतच म्युच्युअल फंड हाऊसेस कडूनही चांगल्या रिटर्नसाठी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले जातात. त्यामुळेच अनेक फंड हाऊसेस स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड्सची ऑफर करतात. अनेक फंड हाऊसेसकडून अनेक स्मॉल कॅप फंड बाजारात आणले आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून कमी कालावधीत दुप्पट नफा मिळू शकतो.