बिझनेसनामा । लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही देशातील सर्वांत मोठ्या विम्या कंपन्यांपैकी एक आहे. जिच्याकडे देशातील एक मोठा ग्राहक वर्ग देखील आहे. LIC देखील देशातील लोकांसाठी अनेक प्रकारच्या पॉलिसी घेऊन असते. चांगला रिटर्न मिळत असल्यामुळे लोकांमध्ये या पॉलिसी लोकप्रिय देखील आहेत. मात्र अशीही अनेक लोकं आहेत जे LIC ची पॉलिसी तर घेतात मात्र काही कारणास्तव ते पुढे चालू ठेवत नाहीत. अशा लोकांकडून मग पॉलिसी मध्यातच बंद केली जाते. ज्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हंटले जाते. मात्र यामध्ये असा प्रश्न उभा राहतो की, पॉलिसी कशी सरेंडर करता येईल ??? हे जाणून घ्या कि, कोणत्याही ग्राहकाला कमीत कमी 3 वर्षानंतरच पॉलिसी सरेंडर करता येते. तसेच जर त्या मुदतीआधीच पॉलिसी सरेंडर केली तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत.
इथे हे लक्षात घ्या कि, पॉलिसी सरेंडर केली तर एलआयसीच्या नियमांनुसारच सरेंडरची व्हॅल्यू दिली जाईल. म्हणजेच जर आपण पॉलिसी मध्येच बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या किंमतीएवढीच रक्कम परत दिली जाईल ज्याला सरेंडर व्हॅल्यू असे म्हंटले जाते. जर आपण पूर्ण 3 वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल तरच आपल्याला सरेंडर व्हॅल्यू मिळू शकेल.
किती पैसे मिळतील ???
हे लक्षात घ्या कि, पॉलिसी सरेंडर करण्याने ग्राहकाचे जास्त नुकसान होते. यामध्ये जर आपण सलग 3 वर्षे प्रीमियम भरला असेल तरच आपल्याला सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल. त्यानंतरही आपल्याला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30 टक्केच रक्कम मिळेल मात्र पहिल्या वर्षाचा प्रीमियम वगळून. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी भरलेला प्रीमियम देखील शून्य होतो. अशा प्रकारे, उर्वरित दोन वर्षांतील फक्त 30 टक्के रक्कमच परत मिळेल. तसेच यामध्ये रायडर्ससाठी भरलेला अतिरिक्त प्रीमियम, टॅक्स आणि LIC कडून मिळालेलय कोणत्याही बोनसचा समावेश नाही.
आपल्याला पॉलिसी सरेंडर करायची असेल त्यासाठी LIC कडून सरेंडर फॉर्म आणि NEFT फॉर्म देखील घ्यावा लागेल. तसेच या फॉर्म्ससोबत आपल्याला पॅन कार्ड आणि पॉलिसीच्या मूळ कागदपत्रांची कॉपी देखील जोडावी लागेल. यासोबतच आपली पॉलिसी बंद करण्या मागील कारण देखील स्पष्ट करावे लागेल.
पॉलिसी सरेंडर करण्यासाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रे…
पॉलिसीचे मूळ बाँड डॉक्युमेंट्स
LIC चा NEFT फॉर्म (सरेंडर फॉर्म वापरत नसाल तर).
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड सारखे ओळखपत्र.
एलआयसी पॉलिसी सरेंडर फॉर्म नंबर 5074. (फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो).
बँक अकाउंट डिटेल्स