बिझनेसनामा ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने काल पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. केंद्राच्या या निर्णयाने पुन्हा एकदा एकदा सर्वांना चकित केले आहे. २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आरबीआयच्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही असं विधान नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी केलं आहे.
एका न्युज मीडिया ला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटल की, बेकायदेशीर पैशांच्या हालचालींना अडचण निर्माण करणे हा या निर्णयामागील उद्देश असू शकतो.रबीआयच्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. सरकार लवकरच या मूल्याच्या नोटा बदलून लहान मूल्याच्या नोटा आणणार आहे. आणि त्याचा पैशाच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पनगरिया यांच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत, देशात चालू असलेल्या एकूण चलनापैकी फक्त १०.८ टक्के रक्कम २००० रुपयांच्या नोटांमधून येते. आणि यामधील जास्तीत जास्त पैसा हा अवैध व्यवहार करण्यासाठी वापरला जातो.
दरम्यान, दोन हजार रुपयांची नोट हि आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत चलनात आणण्यात आली होती. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर व्यवहारात चलनाचा तुटवडा झाल्याने या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. नंतर इतर नोटा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश यशस्वी झाला होता . त्यामुळे 2018-19 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. आता तर सरकारने या नोटाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.