बिझनेसनामा ऑनलाईन । दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईल मधील अँप्लिकेशन्सचा वापर करत असतो. त्यातील सर्वात लोकप्रिय ॲप म्हणजे व्हॉट्सॲप (Whatsapp). व्हॉट्सॲप हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. आजच्या काळात एकही व्यक्ती आपल्याला अशी सापडणार नाही ज्याच्या मोबाईल मध्ये Whatsapp नाही. केवळ भारतातील Whatsapp वापरकर्त्यांची संख्या ही 400 दशलक्षांपेक्षा जास्त आहे.
या ॲपची आपल्याला इतकी सवय झाली आहे कि जर कोणाला काही शेयर करायचे असेल तर तो व्यक्ती शेयर करा न म्हणता व्हॉट्सॲप करा असे म्हणतो. व्हॉट्सॲपच्या (Whatsapp) वाढत्या लोकप्रियतेमुळे, कंपनी नेहमीच नव नवीन फिचर्स काढत असते. पण बऱ्याच लोकांना या फिचर्स ची माहिती नसल्यामुळे याचा लाभ घेता येत नाही. तर चला मग आपण आज ३ हिडन फीचर्स पाहूया जेणेकरून तुम्ही ही स्मार्ट युजर बनाल.
१. मेसेज वाचला तरी Blue Tick दिसणार नाही
व्हॉट्सॲप (Whatsapp) मध्ये जेव्हा तुम्ही एखादा मेसेज वाचता तेव्हा तिथे ब्लू टिक (Blue Tick) येते. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्याचा मेसेज वाचला आहे, हे कळून द्यायचे नसेल तर व्हॉट्सॲप मध्ये त्यासाठी एक फिचर उपलब्ध आहे. ब्ल्यू टिक न दिसण्यासाठी सेटिंगमध्ये हे बदल करा –
यासाठी व्हाट्सअँप च्या सेटिंग्ज (Setting) मध्ये जा नंतर अकाउंट्स (Accounts) मध्ये जा, त्यांनतर प्रायव्हसी (Privacy) मध्ये जा. आता तुम्हाला तेथे रीड रेसिप्टन्स (Read Receipt नावाचा ऑपशन (Option) दिसेल. त्या ऑप्शन समोर तुम्हाला एक चेकबॉक्स (Checkbox) दिसेल त्यावर क्लिक करून अनबॉक्स (Uncheck) करा. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मेसेज वाचला असेल तरी त्याला कळणार नाही कि, तुम्ही तो मेसेज वाचला आहे. कारण, त्या मेसेजवर आता (Blue Tic) येन बंद झालेले असेल.
२. नेहमी वापरात असणारे Whatsapp Chat शॉर्टकट कसे बनवायचे?
अनेक लोकांचे कॉलेज किंवा कंपनी चे व्हॉट्सॲपवर महत्वाचे ग्रुप असतात तर काही व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी जास्त प्रमाणात बोलतात. हे ग्रुप/चॅट सतत व्हॉट्सॲप अँप खोलण्यापेक्षा तुम्ही शॉर्टकट (Shortcut) म्हणून तुमच्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर (Home Screen ) ठेवू शकता.
यासाठी त्या व्यक्तीच्या चॅटला जास्त वेळ प्रेस (Press) करून ठेवा. त्यांनतर तिथे तुम्हाला उजव्या बाजूला तीन डॉट्स (dots) दिसतात त्यावर क्लिक करा, क्लिक केल्यांनतर तिथे ऍड टू शॉर्टकट्स (Add to Shortcuts) असा ऑपशन (Option) असतो, त्यावर क्लिक करा. आता त्या व्यक्तीचे चॅट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर (Home Screen ) दिसेल. जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीचे चॅट डायरेक्ट उघडू शकता.
३. महत्वाचे मेसेज डिलीट होऊ नयेत म्हणून काय करावं?
बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवर (Whatsapp) चॅट किंवा ग्रुपवर आपल्याला महत्वाच्या फाईल (pdf) किंवा काही मेसेजस शेयर केले जातात आणि आपल्याला अचानक गरज पडली कि ते शोधायला खूप वेळ लागतो. यासाठी व्हॉट्सॲपवर (Whatsapp) एक फिचर आहे जे आपण सहजरित्या वापरू शकतो.
यासाठी व्हॉट्सॲपवर (Whatsapp) एखादे चॅट/ग्रुप खोला आणि तुम्हाला जो मेसेज महत्वाचा वाटतो त्यावर जास्त वेळ प्रेस करा. यानंतर वर तुम्हाला स्टार चे चिन्ह दिसेल त्यावर टॅप करा. अशा प्रकारे आपण त्या मेसेजला स्टाड मेसेजच्या (starred messages) यादीत टाकले. आता जेव्हा तुम्हाला त्या मेसेज ची गरज वाटेल तेव्हा आपण तुम्ही तेथून सहज ते मेसेज मिळवू शकता.