Whatsapp : तुम्ही व्हॅट्सऍपचे वापरकर्ते आहात का? नक्कीच असाल!! कारण आत्ताच्या घडीला देशात असा एकही स्मार्टफोन वापरकर्ता नाही ज्याच्या मोबाईलमध्ये व्हॅट्सऍप नसेल. व्हॅट्सऍपमुळे आपण देश तसेच परदेशातील आप्त जनांशी सहजपणे संपर्क साधू शकतो. व्हॅट्सऍपने दिलेल्या काही खास फीचर्समुळे व्हॉइस मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग आणि पेमेंट्स यासारख्या सुविधांच्या लाभ मिळवता येतो. कोविडच्या काळात जेव्हा संपूर्णजग बंद झालं होतं, तेव्हा व्हॅट्सऍपच्या साहाय्याने आपण व्यावहार सुरू ठेवले होते. व्हॅट्सऍपवर असणारे अनेक ग्रुप्स हे आपल्या जीवनाचा एक भागच बनले आहेत. व्हॅट्सऍपची आपल्या आयुष्यात असलेली एवढी मोठी पकड पाहता, ही बातमी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. कारण यावर्षी कदाचित जून महिन्यापर्यंत व्हॅट्सऍप कडून फ्री क्लाऊड स्टोरेज सर्विस (Free Claud Storage Service) बंद केली जाईल. याचा आपल्यावर होणारा परिणाम काय? फ्री क्लाऊड स्टोरेज सर्विस बंद केली गेल्याने तुम्ही जुन्या मेसेजेसचा बॅकअप ठेवू शकणार नाही, व्हॅट्सऍप उघडल्यानंतर आपल्याला एक भला मोठा चॅट दिसतो हाच व्हॅट्सऍपचा बॅकअप चॅट (Backup Chat) आहे. मात्र 2024 पासून व्हॅट्सऍप कडून ही सेवा बंद करण्यात येईल.
व्हॅट्सऍप चॅट्स गायब होणार? (Whatsapp)
आतापर्यंत आपण व्हाट्सअप चॅट वर फ्री गुगल ड्राईव्ह (Free Google Drive) चा वापर करत होतो. त्यामुळे आपोआप व्हॅट्सऍप चॅट्स हे गुगल ड्राईव्ह बॅकअप (Google Drive Backup) मध्ये सामावले जात होते. मात्र आता गुगलने व्हॅट्सऍप चॅटसाठी एक वेगळा ड्राईव्ह बॅकअप न देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर अँड्रॉइड डिव्हाइस (Android Devices) च्या वापरकर्त्यांना एकूण 15GB चा मोफत क्लाऊड स्टोरेज बॅकअप मिळेल ज्यामध्ये तुम्हाला Gmail ड्राईव्ह आणि व्हॅट्सऍप चॅट बॅकअप दिले जाईल.
दर महिन्याला भरावे लागणार 130 रुपये :
या नवीन निर्णयानंतर तुम्हाला जर का व्हाट्सअप बॅकअप मध्ये अजून जागा हवी असेल तर या 15GB स्पेस व्यतिरिक्त तुम्हाला क्लाऊड स्टोरेज विकत घ्यावी लागेल. ही क्लाऊड स्टोरेज विकत घेण्यासाठी दर महिन्याला 130 रुपये शुल्क आकारले जाईल. गुगलकडून गुगल ड्राईव्हच्या बाबतीत काही नियम बदलले गेल्याने वर्ष 2024 च्या जून महिन्यापासून व्हॅट्सऍपच्या वापरकर्त्यांसाठी हे नियम कायमचे बदलतील (Whatsapp). व्हॅट्सऍप कडून या नवीन नियमांबद्दल 30 दिवस आधीच नोटिफिकेशन पाठवून माहिती दिली जाईल. सध्या व्हॅट्सऍप मध्ये बीटा अपडेटसाठी रोल आउट सुरू झालाय व या अंतर्गत कदाचित व्हॅट्सऍप गुगल बॅकअप साठी फोटो आणि व्हिडिओ कायमचे हटवू शकते. त्यानंतर वापरकर्त्यांना केवळ संदेश पाठवण्यासाठीच क्लाऊड स्टोरेज दिली जाणार आहे.