Wheat Production in India: गहू उत्पादकांना यंदा मिळणार आनंदाची बातमी; MSP वरून सर्वाधिक खरेदी होण्याची सरकारला आशा

Wheat Production In India : भारत हा मुळातच कृषीप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. शेती व्यवसाय हा गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या चालत आलाय, आणि शेतकरी हा नेहमीच आपला अन्नदाता म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात विविध वातावरण परिस्थितींनुसार पिकांचे उत्पादन बदलत जाते. तुमच्या वाचनात कदाचित रबी आणि खरीप असे दोन प्रकारचे हंगाम आलेच असतील. यापैकी रबी हंगामाच्या बाबतीत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Food Cooperation Of India) चेअरमन तसेच एमडी अशोक के मिणा (Ashok K Meena) यांनी गव्हाच्या पिकाबाबत एक महत्त्वाची बातमी माध्यमांना दिली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी गव्हाचे पीक वाढण्याची शक्यता आहे.

त्यांनी सादर केलेल्या वृत्तात 1 जानेवारी पर्यंत राहिलेली रबी हंगामाची पेरणी पूर्ण होईल, गेल्या वर्षात 25 डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 320.54 हेक्टर जागेवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली होती. पीक वर्ष 2022-23 (जुलै ते जून) मध्ये गव्हाचे उत्पादन सुमारे 11 कोटी टन होते, तर मागील वर्षी 0.77 कोटी टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. मीना यांच्या मते यावर्षी गव्हाचे जास्तीत जास्त उत्पन्न वाढवू शकते, हवामानातील परिस्थितीचा अंदाज घेतल्यास यावर्षी गव्हाचे उत्पन्न जवळपास 11.4 कोटी टन पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पेरणीच्या क्षेत्रात होते आहे दमदार वाढ: (Wheat Production in India)

देशाच्या कृषी मंत्रालयाने लावलेल्या अंदाजाप्रमाणे यावर्षी हवामान अनुकूल राहिले तर यंदा गव्हाच्या उत्पन्नात दमदार वाढ होऊ शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आपण गव्हाच्या पिकात लक्षणीय वाढ केलेली आहे. काही राज्यांमध्ये अजूनही गव्हाची पेरणी काही टक्के बाकी असली तरीही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण क्षेत्रात पेरणी पूर्ण झालेली असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत मीना यांच्या म्हणण्यानुसार गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (Wheat MPS) सात टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे (Wheat Production in India). या सर्व परिस्थितींचा अंदाज घेतला तर सरकारच्या मते यावर्षी 2275 रुपये प्रतिक्विंटल गव्हाची खरेदी केली जाऊ शकते, आणि अधिकाधिक शेतकरी आपल्या गव्हाची विक्री FCI ला करतील असा अंदाज सरकारकडून व्यक्त केला जात आहे.

FCI सुद्धा भारत आटा ब्रँडसाठी गहू विकत घेतो:

कृषिप्रधान भारतात शेतीला नेहमीच प्राधान्य देण्यात आलंय. आपल्याकडे हवामानाच्या अनुसार शेतीचं पीक बदलतं आणि म्हणूनच शेतीचा बाजार देखील भलामोठा आहे. यंदाच्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन होणे ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे (Wheat Production in India), कारण एफसीआय (FCI) च्या साठ्यातून खुल्या बाजारात गहू वितरीत केला जात होता आणि आतापर्यंत 59 लाख टन गहू खुल्या बाजारात विकला गेला आहे. यातील काही प्रमाणात गव्हाची खरेदी सरकारनेही भारत आटा ब्रँडसाठी केली होती व त्यामुळे FCI चा साठा कमी झाला होता.