White Strawberry In Maharashtra: महाराष्ट्रात सुरु झालीये पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड; हा अनोखा शेतकरी आहे तरी कोण?

White Strawberry In Maharashtra: खरं तर स्ट्रॉबेरी हे फळ भारतीय नाही, आणि या फळाची लागवड अमेरिका आणि यूकेमध्ये केलेली पाहायला मिळते. मात्र आजच्या जगात आपण एवढे भौगोलिक घटक मनात नाही आणि तंत्रज्ञांच्या साहाय्याने कुठलंही पीक कुठल्याही प्रदेशात उगवता येतं, याचंच एक उदाहरण आज महाराष्ट्रातही पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील एका भागात एक माणसाने पांढऱ्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन सुरु केलंय आणि याला ग्राहकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. कोण आहे तो माणूस आणि कसा करतोय हा व्यवसाय जाणून घेऊया …

महाराष्ट्रातील व्हाईट स्ट्रॉबेरी विक्रेता कोण? (White Strawberry In Maharashtra)

वाई फुलेनगर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड करून यशस्वी पीक घेतले आहे. लाल स्ट्रॉबेरीपेक्षा वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली. सध्या या स्ट्रॉबेरीची विक्री काही ठिकाणी सुरू झाली आहे आणि लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विक्री केली जाईल आणि यानंतर ग्राहकांना घरी बसल्या बसल्या पांढऱ्या स्ट्रॉबेरी खरेदी करता येतील.

भारतात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा पहिला प्रयत्न साताऱ्यातील शेतकरी उमेश खामकर यांनी केला आहे. हे खरंच खूपच अप्रतिम धाडस म्हणावं लागेल, नाही का? त्यांनी फ्लोरिडा विद्यापीठातून या पांढऱ्या स्ट्रॉबेरीसाठी विशेष परवानगी (रॉयल्टी हक्क) विकत घेतले आहेत. याचा अर्थ असा की, भारतात इतर कोणालाही पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड करायची असेल तर त्यांना उमेश खामकर यांच्याकडून परवानगी घ्यावी लागेल(White Strawberry In Maharashtra). अशा प्रकारे, उमेश खामकर हे भारतात पांढऱ्या स्ट्रॉबेरीचे जनक म्हटले जाऊ शकतात. लाल स्ट्रॉबेरीपेक्षा ही स्ट्रॉबेरी थोडी गोड आहे सोबतच ती पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. कमी आंबटपणामुळे ती लोकप्रिय ठरते. परदेशात तीला खूप पसंत केली जातेच आणि भारतातही तिचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.