Wholesale Inflation Rate : आजच समोर आलेल्या माहितीनुसार जागतिक अर्थव्यवस्थेची एकूण परिस्थिती यंदाच्या वर्षात गंभीर असू शकते असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. जगभरातील अनेक अर्थशास्त्रज्ञांनी यंदाच्या वर्षी जगभरातील अर्थव्यवस्था कमकुवत असण्याला काही कारणांसोबत मांडले आहे. आपल्या देशात आजच घाऊक महागाईचे दर समोर आले आहेत. या आकड्यांच्या नुसार डिसेंबर महिन्यात अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्याचा परिणाम घाऊक महागाईच्या दरावर दिसून आला नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये 2.06 टक्के असलेला घाऊक महागाईचा आकडा डिसेंबर महिन्यात 0.7 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. आजच वाणिज्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाईचा दर हा शून्य टक्क्यांच्या वर गेला आहे आणि गेल्या 9 महिन्यातील हा महागाईचा उच्चांक म्हणावा लागेल. घाऊक महागाई वाढण्यात खाद्य महागाई आणि इंधन, ऊर्जा महागाई असे घटक जबाबदार ठरतात.
देशात घाऊक महागाईच्या आकड्यांमध्ये वाढ: (Wholesale Inflation Rate)
वाणिज्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकड्यांनुसार सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाईचा आकडा शून्याच्या पार गेला आहे. 2023-24 या वर्षातील आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सध्याचा घाऊक महागाईचा दर हा डिफ्लेशन झोनच्या(Depletion Zone) श्रेणीत पाहायला मिळतोय. बाजारात विक्री होणाऱ्या घटकांवर नजर टाकली तर इंधन आणि ऊर्जा यांच्या किमती निर्देशांकात 0.7 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली तसेच उत्पादित उत्पन्नाच्या किमतीत निर्देशांकात 0.21 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत खाद्यपदार्थांच्या किमतीत 1.78 टक्क्यांची घसरण दिसून आली असून भाजीपाला, फळे, अंडी, मास-मच्छी यांच्या किमतीतही घट झाली आहे व डाळींच्या किमती हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते(Wholesale Inflation Rate). डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळाली, सध्या किरकोळ महागाईचा(Marginal Inflation) दर हा 5.69 टक्के आहे व ही वाढ खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने झाली असल्याचे सांगण्यात येते.