Widow Pension Scheme: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि निराधार विधवा महिलांना मदत करण्यासाठी, महाराष्ट्र सरकार अनेक योजना राबवत असते. यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे “इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना” होय. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ही निराधार विधवा महिलांसाठी एक वरदान आहे. या योजनेमुळे त्यांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.
विधवा महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना: (Widow Pension Scheme)
राज्यातील विधवा महिलांना आर्थिक मदत देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे त्यांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिला 40 ते 70 वर्षांच्या काळातील असल्या पाहिजेत. ही योजना महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात असल्याने लाभार्थी महिला किमान 15 वर्षांपासून राज्याची रहिवासी असली पाहिजे. सोबत अर्जदार महिलेचा फोटो, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स आणि रहिवासी दाखला असायला हवा. अर्जदार महिला ही खरोखर गरजू आहे हे जाणून घेण्यासाठी सरकारला विधवा महिला अर्जदाराच्या पतीचा मृत्यु दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक असतो. या योजनेत अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट द्यावी (Widow Pension Scheme) किंवा घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate