WindFall Tax: सरकारने काल म्हणजेच शुक्रवारी कच्या तेलवरील विंडफॉल टॅक्स जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अधिसूचनाही शुक्रवारीच जारी करण्यात आली होती. सरकारच्या याच नवीन निर्णयानुसार नवीन दर आज म्हणजेच शनिवारपासून लागू झाले आहेत. सरकारने जरी हा निर्णय घेतला असला तरीही डीजल, ATF आणि पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मागील एका महिन्यात कच्या तेलच्या किंमतीत होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम टॅक्सच्या दरांवरही दिसून आला. जानेवारीच्या सुरुवातीला टॅक्समध्ये वाढ करण्यात आली होती, त्यानंतर जानेवारीच्या मध्यभागी त्यात कपात करण्यात आली आणि आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा टॅक्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
नवीन निर्णयानुसार कशा असतील किमती?
सरकारने कच्या तेलावरील विंडफॉल टॅक्स 3200 रुपये प्रति टन करून दुप्पट केला आहे. पूर्वी हा टॅक्स 1700 रुपये प्रति टन होता. पेट्रोल, डीजल आणि ATF वरील टॅक्स मात्र शून्य टक्क्यांवरच राहणार आहे, कारण या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही(WindFall Tax). जसजशी क्रूड ऑइलची किंमत वाढते तसतसे विंडफॉल टॅक्सचा दरही वाढतो आणि किंमत कमी झाल्यास टॅक्सचा दरही कमी होतो. मागील एका महिन्यात क्रूड ऑइलच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याने विंडफॉल टॅक्सच्या दरातही बदल पाहिला गेला.
विंडफॉल टॅक्स म्हणजे काय? (WindFall Tax)
वर्ष 2022 मध्ये भारतात पहिल्यांदाच विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला होता. हा टॅक्स एखाद्या उद्योगावर तेव्हा लादला जातो जेव्हा कंपन्यांना अचानक प्रचंड नफा कमावू लागतात. हा नफा उद्योग किंवा कंपन्यांना त्यांच्या रणनीतीमुळे नाही तर परिस्थितीतील बदलामुळे मिळतो असतो.
विंडफॉल टॅक्स हा सामान्य कर दरापेक्षा जास्त आणि वेगळा असतो. विंडफॉल टॅक्समुळे उद्योगांना नफ्यासाठी उत्पादनाचा पुरवठा नियंत्रित करण्यापासून रोखण्यास मदत होते, ज्यामुळे घरगुती पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय उपकरणे आणि मास्क बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता आणि तेव्हा सरकारने या नफ्यावरही विंडफॉल टॅक्स लादला होता.