Wipro Company वर्क फ्रॉम होम बंद करणार? 15 नोव्हेंबरपासून नवा नियम?

Wipro Company : कोरोनाच्या काळापासून देशात कामाची एक नवीन पद्धत सुरु झाली ती म्हणजे घरून काम करणे किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये Work From Home म्हणतो. यामुळे घरून आरामात काम करण्याची एक सवय लागली आहे. मात्र आता काही कंपन्या त्यांच्या कर्मचारी वर्गाला पुन्हा कामावर बोलावण्याच्या तयारीत आहे. कामाचे स्वरूप लक्ष्यात घेत 10 ते 12 कर्मचारी असलेल्या छोट्या गटाला आता कामावर रुजू होण्याची नोटीस मिळत आहे. आणि आता विप्रो हि कंपनी सुद्धा यात सहभागी झाली असून आता इथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागणार आहे.

Wipro Company म्हणतेय ऑफिसमध्ये या:

अलीकडच्या दिवसांमध्ये टाटा कंपनी, इन्फोसिस यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांच्या नावे ऑफिस मधून काम करण्याची नोटीस जारी केली होती. त्यांच्याकडून आठवड्याभराच्या कामात काही सवलतही देण्यात आली होती. आता याच बाबतीत एक नवीन बातमी समोर आलेली असून Wipro Company ने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये रुजू होण्याचा आदेश दिलं आहे. 15 नोव्हेंबर पासून Wipro मध्ये काम करणाऱ्या मंडळींनी ऑफिसमध्ये हजेरी लावणं अनिवार्य असणार आहे.

मात्र टाटा आणि इन्फोसिस या दोन्ही कंपन्यांप्रमाणे Wipro Company ने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना काही सवलती देत असून कर्मचार्यांकडून आठवड्यातून केवळ तीन दिवस ऑफिस मध्ये बसून काम करण्याची अपेक्षा केली जात आहे. कोरोनाचा काळ उलटून आता भला मोठा अवधी निघून गेला आहे आणि पुन्हा एकदा नोकरदार वर्गाने ऑफिसमध्ये बसून काम करावं अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एकत्रित काम केल्यामुळे कर्मचारी एकमेकांना ओळखतील, त्यांच्यातील संवाद वाढेल, आणि कामाला वेघ येईल अशी विप्रोची मानसिकता आहे.