Wipro Merger : देशातील एक नावाजलेली IT कंपनी म्हणजे विप्रो, बाजारात आपल्या तीन महिन्यांचा निकाल जाहीर करण्यासोबतच विप्रोने एक महत्वाची घोषणा केली आहे. काही दिवसांतच हि कंपनी आपल्या 5 उपकंपन्यांचे विलीनीकरण करणार आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे व्यवसाय अजून बळकट करण्यासाठी, प्रशासकीय आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. विलीनीकरण होणाऱ्या सर्व उप कंपन्या विप्रोच्या मालकीच्या असल्यामुळे यांबाबत नवीन शेअर्स दिले जाणार नाहीत.
उपकंपन्यांचे विलीनीकरण आणि कर्मचाऱ्यांची घसरण : Wipro Merger
विप्रो आपल्या पाच प्रमुख उपकंपन्यांचे विलीनीकरण करणार असून यात, विप्रो एचआर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wipro HR Services India Private Limited), विप्रो ओव्हरसीज आयटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Wipro Overseas India Services India Private Limited), विप्रो ट्रेडमार्क होल्डिंग लिमिटेड ( Wipro Trademark Holding Limited), विप्रो व्हीएलएसआय डिझाईन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( Wipro VLSI Design Services India Private Limited) आणि विप्रो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ( Wipro Technology Product Services Private Limited) यांचा समावेश आहे.
या विलानीकरणाबरोबरच कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी कामाला रामराम ठोकला आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कंपनीच्या कर्मचारी वर्गात 5,051 एवढी घट झाली. मात्र लगेचच कंपनीने नवीन कर्मचारी नियुक्त केल्यामुळे आता एकूण 2,44,707 कर्मचारी कंपनीच्या कामात रुजू आहेत.