Wipro Shares : तुम्हाला अजीज प्रेमजी आणि त्यांची प्रसिद्ध कंपनी विप्रो कंपनी माहिती आहे ना? आपल्या देशातील अनेक मोठमोठ्याला IT कंपन्यांपैकी विप्रो ही देखील एक प्रसिद्ध कंपनी आहे आणि याची सुरुवात अजीज प्रेमजी यांनी केली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार अजीज प्रेमजी यांनी 1.02 कोटी इक्विटी शेअर्स आपल्या दोन्ही मुलांच्या नावे केले आहेत, रिशद प्रेमजी आणि तारीक प्रेमजी यांना गिफ्ट म्हणून वडिलांनी कंपनीतील काही टक्के शेअर्स देऊ केले आहेत. काल BSE Sensex वर कंपनीचा व्यवहार 458 रुपयांवर बंद झाला होता आणि आज सकाळीच विप्रोचे शेअर्समध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली होती.
अजीज प्रेमजी यांनी मुलांना भेट केले शेअर्स: (Wipro Shares)
विप्रो या कंपनीचे मालक अजीज प्रेमजी यांनी आपल्या दोन्ही मुलांना कंपनीतील काही शेअर्स भेट केले आहेत. त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मुलांना 0.20 टक्के भेट म्हणून दिलेत. रिशद प्रेमजी यांनी दिलेल्या माहितीनुसार विप्रो लिमिटेड या कंपनीमधून वडिलांनी त्यांना 51,15,090 इक्विटी शेअर्स भेट म्हणून देऊ केलेत.
अजीज प्रेमजी यांचा मुलगा रिशद प्रेमजी हे एक IT कर्मचारी आहेत आणि ते विप्रो कंपनीमध्ये चेअरमन आणि MD म्हणून जबाबदारी सांभाळतात. रिशद प्रेमजी यांनी मुंबई मधल्या The Cathedral Of John Canon मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे Howard Business School मधून MBA ची पदवी मिळवली. विप्रोच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत रिशद प्रेमजी यांनी क्लाऊड कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि AI सारख्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. दुसऱ्या बाजूला तारीक प्रेमजी हे विप्रोच्या एंटरप्राईजेस बोर्डचे मेंबर आहेत ते वर्ष 2018 मध्ये या बोर्ड मध्ये सामील झाले होते. तारीक प्रेमजी यांनी St. Joseph कॉलेजमधून B.com ची पदवी मिळवली असून ते आपल्या वडिलांप्रमाणे सामाजिक कार्यातून नेहमीच इतरांना आर्थिक मदत करीत असतात.