Women Scheme: उद्या पूर्ण जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे आणि या खास दिवसाचं औचित्य साधून सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या महिलांसाठीच्या ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आली आणि याचा उद्देश महिलांच्या आर्थिक वाढीला चालना देणे असाच आहे.
काय आहे महिलांसाठीची योजना? (Women Scheme)
इंडिया पोस्टद्वारे राबवली जाणारी महिला सन्मान बचत योजना महिलांसाठी एक उत्तम गुंतवणुकीची संधी आहे. या योजनेद्वारे महिला 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात आणि त्यावर 7.5 टक्क्यांच्या दराने व्याज मिळवू शकतात. महत्वाचं म्हणजे या योजनांतर्गत महिला स्वतःसाठी आणि आपल्या अल्पवयीन मुलीसाठी एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतात, खाते उघडल्याच्या 2 वर्षांत ही योजना परिपक्व होते.
आर्थिक स्वातंत्र्य ही प्रत्येक महिलेसाठी गरजेची गोष्ट आहे आणि ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना महिलांसाठी एक उत्तम पर्याय आहे, ज्यात गुंतवणूक करून त्या आर्थिक सुरक्षितता मिळवू शकतात.
खाते कसे उघडायचे?
- आधार आणि पॅन कार्ड सारखी KYC कागदपत्रे
- पे-इन स्लिप (Pay-In Slip)
- रोख रक्कम किंवा चेक
या कागदपत्रांसह तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ खात्यासाठी अर्ज करू शकता(Women Scheme).
योजनेचे फायदे:
- योजनेची सुरुवात किमान 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीपासून करता येते.
- जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
- एका ठेवीदाराला 3 महिन्यांच्या अंतराने एकापेक्षा जास्त खाती उघडता येतात.
- 1 वर्षानंतर 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते.
- 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज दर मिळतो.
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.