Work From Home: या संकल्पनेने अनेकांना घरबसल्या पैसे कमावण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. इथे ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचा वेळ वाचतो तसेच माणसाची एनर्जी देखील बऱ्याच प्रमाणात कायम राहायला मदत होते. तुम्हाला देखील अश्याच प्रकारची घर बसल्या कामं करण्याची इच्छा असेल तर आम्ही काही भन्नाट कल्पना सुचवणार आहोत, ज्यांचा नक्कीच तुम्ही विचार करू शकता. इथे काम मिळवण्यासाठी काही मोठं मोठाल्या इंटरव्यूसाठी तयारी करण्याची गरज नसते. अगदीच हलक्या फुलक्या आयुष्यात आणि घर बसल्या तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. प्रत्येकाने जमेल त्या परिस्थितीत काम करण्याची तयारी दाखवली पाहिजे स्वबळावर, आणि कष्ट करत जगलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या भन्नाट कल्पना नेमक्या आहेत तरी कोणत्या…
१) फ्रीलान्स रायटिंग: Freelance Writing
तुम्हाला लिहण्याची किंवा वाचनाची आवड आहे का? भले तुम्ही निवडलेली भाष्या कोणतीही असो, तर घर बसल्या एक व्यवसाय तुम्हाला भरगोस कमाई करण्यात मदत करू शकतो, तो म्हणजे फ्रीलान्स रायटिंग. यासाठी अनेक मीडिया हाऊस, किंवा कंपन्या तुम्हाला ऑफर्स देऊ करतील. किंवा काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा तुम्ही वापर करू शकता, विशेष करून यात अपवर्क आणि फिवरर यांचा समावेश होतो. हे काम तुम्हाला केवळ देशातच नाही तर विदेशात देखील करियर घडवण्यात मदत करेल (Work From Home). इथे काम करणारा माणूस 40 ते 50 हजार रुपयांची कमाई दर महिन्याला करू शकतो.
२) डेटा एनालिस्ट: Data Analyst
आत्ताच्या काळात या कामाला भरपूर मागणी आहे, त्यामुळे या कामाचा करियर म्हणून नक्कीच विचार केला जाऊ शकतो. या संदभार्त अधिक माहिती हवी असेल तर ऑनलाईन कित्येक कोर्सेस उपलब्ध आहेत, त्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. हातात योग्य प्रमाणपत्र असेल तर काम -मिळवणं सोपं होऊन जातं. इथे अधिकाधिक अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप किंवा ट्रेनी म्हणून काम करावं लागतं . तसेच घरून काम करण्यासाठी (Work From Home) लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनची सोया उपलब्ध असणं गरजेचं आहे. डेटा एनालिस्ट म्हणून काम करत तुम्ही दिवसाला 200 ते 1500 रुपयांची कमाई करू शकता.
३) ट्रान्सलेटर: Work From Home
ज्या माणसाला भाषेची भरपूर आवड आहे तो माणूस घर बसल्या ट्रान्स्लेटर म्हणून काम नक्कीच करू शकतो. खास करून इंग्रजी या भाषेवर जर का अधिक चांगले प्रभुत्व असेल तर तुमचा हात धरणारा निदान या क्षेत्रात तरी कोणीही असणार नाही. अनेकवेळा परदेशी भाष्यांचा इंग्रजी भाषेत अनुवाद करणारा माणूस अनेक कंपन्यांच्या पाहण्यात असतो म्हणूनच घरबसल्या पैसे कमावण्याची हि संधी फारच उपयुक्त ठरू शकते (Work From Home). महिन्याभरात ट्रान्सलेटर म्हणून काम करणारा माणूस 30 हजार रुपयांची कमाई करू शकतो.