बिझनेसनामा ऑनलाईन । आधुनिक जग हे हाय स्पीड इंटरनेट चे असून आता सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. इंटरनेटमुळे आता अनेक कामे घरी बसून ऑनलाईन करणे शक्य झाले आहे. यामुळे आता अनेक प्रकारचे जॉब तुम्ही घरूनच म्हणजे वर्क फ्रॉम होम (Work from Home Jobs) करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग वर्क फ्रॉम होम जॉब बाबत माहिती देणार आहोत.
इंटरनेटच्या या जगात आता ऑफिसला जायची गरजच राहिलेली नाही. सध्या अनेक प्रकारची ऑफीस कामे ऑनलाईन पद्धतीने घरी बसून सहज करता येत आहेत. शिवाय वर्क फ्रॉम होममुळे प्रवासातील वेळेचीही बचत होत असल्याने अनेकजण अशा नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. तुम्हालाही घरी बसून एखादी नोकरी करायची असेल तर फक्त चांगले इंटरनेट कनेक्शन आणि लॅपटॉप अथवा मोबाईल या साधनांची आवश्यकता लागते. पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि कुठे मिळणार असे WFH जॉब? तर यासाठी तुम्हाला फिवर, अपवर्क, लींकडिन या सारख्या अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत.
सोशल मिडिया मॅनेजर (Social Media Manager)
सोशल मिडिया मॅनेजर हे एक स्पीडने वाढणारे क्षेत्र आहे. आज काल सर्व बिजनेस ऑनलाईन झाल्यामुळे सोशल मिडिया मॅनेजर ची अत्यंत गरज वाढली आहे. कंपनी, सेलिब्रेटी यांना नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव राहणे शक्य नसते म्हणूनच त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट मॅनेज करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया मॅनेजरची गरज लागते. (Work from Home Jobs)
यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, पिंटरेस्ट, लिंकडिन इ. सारखे सोशल प्लॅटफॉर्म तुम्हाला हाताळता येणे आवश्यक आहे. सोशल मिडिया मॅनेजर चा जॉब करण्यासाठी तुम्हाला लोकांशी संवाद साधता आला पाहिजे आणि त्यांच्या कोणत्याही प्रश्नांना वेळेवर व योग्य असे उत्तर देता आले पाहिजे. तसेच लोक तुमच्या अकाउंट वर गुंतून राहावेत व जास्तीत जास्त फॉलोवर्स वाढावेत यासाठी तशा रिलेटेड कंटेन्ट लिहून पोस्ट करता येणे गरजेचे आहे.
वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजर हा एक उत्तम मार्ग आहे. Elance.com, careerbuilder.com, simplyhired.com या काही वेबसाइट आहेत ज्या तुम्हाला तुमचा सोशल मीडिया मॅनेजर जॉब मिळवण्यास मदत करू शकतात.
कंटेन्ट रायटर (Content Writer)
जर तुम्हाला क्रीएटीव्ह क्षेत्रात जाण्याची आवड असेल तर कंटेन्ट रायटिंग हा चांगला पर्याय आहे. ब्लॉग रायटिंग, व्हिडिओ स्क्रिप्ट लिहिणे , eBook तयार करणे इत्यादी अनेक कॅटॅगरी कंटेन्ट रायटिंग जॉब मध्ये येतात.
ब्लॉग रायटिंग म्हणजे एक अशी ऑनलाईन जागा जिथे आपण आपल्या विचारांना आपल्या भाषेत इंटरनेटवर प्रकाशित करू शकतो. यामध्ये कन्टेन्ट रायटर ऑडियन्सची मानसिकता ओळखून घेऊन त्यानुसार टॉपिक निवडतो व ऑडियन्स ला प्रोवाईड करतो.
कंटेन्ट रायटरचे टार्गेट हे नेहमी ऑडियन्स असते. कन्टेन्ट रायटर जर कंपनी/व्यक्ती साठी काम करत असेल तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कस्टमर आकर्षित करणे, त्या ब्रँड ची आकर्षकरित्या माहिती पुरवणे व कस्टमर ला ते घेण्यास प्रवृत्त करणे हे काम कंटेन्ट रायटर करतो.
आजकाल मार्केटमद्ये कंटेंट रायटरची मागणी वाढली आहे. Smart Blogger Jobs Board, Upwork , FlexJobs, LinkedIn, ProBlogger इत्यादी वेबसाईट तुम्हाला कन्टेन्ट रायटिंग मध्ये करियर घडवायला मदत करू शकतात.
वेबसाईट डेव्हलपर (Website Developer)
आजकालच्या युगात प्रत्येक व्यक्ती, कंपनी, ब्रँडला डिजिटल होण्यासाठी स्वतःची वेबसाईट असणे आवश्यक आहे. या वेबसाईट ला भेट देऊन लोकांना आवश्यक असलेली माहिती मिळू शकते. याकरता आकर्षित करणाऱ्या, माहिती देणार्या आणि मनोरंजन करणाऱ्या वेबसाइट तयार करायला ब्रँडना वेबसाइट डेव्हलपरची गरज असते. Work from Home Jobs
वेब डेव्हलपर चे तीन प्रकार आहेत
- फ्रंट-एंड डेव्हलपर
- बॅक एंड डेव्हलपर
- फुल स्टॅक डेव्हलपर
तुम्हाला वेब डेव्हलपर बनण्यासाठी कोडींग म्हणजेच HTML, CSS आणि JavaScript सारख्या कॉम्पुटर लँगवेज येणे आवश्यक आहे. या कॉम्पुटर लँगवेज मदतीने तुम्ही वेबसाईट तयार करू शकता. या कॉम्पुटर लँगवेज शिकण्यासाठी बरेच ऑनलाईन/ऑफलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.
Authentic Jobs, GitHub, Indeed, Jobbatical, Krop, Mashable या काही वेबसाइट आहेत ज्या तुम्हाला तुमचा वेब डेव्हलपर जॉब मिळवण्यास मदत करू शकतात.