Work From Office : चार वर्षानंरही कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येईनात; अमेरिकेत चाललाय भलताच प्रकार

Work From Office : कोविडच्या महामारीपासून केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात घरून काम करण्याची संकल्पना रूढ झाली आहे. मात्र महामारीचा काळ मागे सारून आता बरीच वर्ष झाली असल्याने बहुतेक ठिकाणी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये येण्याची सक्ती करीत आहेत. कर्मचाऱ्यांना काही काळ पूर्वी पुन्हा कंपनीमध्ये जाण्याची इच्छा होती, मात्र आता घरून काम करण्याची सवय अंगी लागल्यामुळे बऱ्याच लोकांना पुन्हा कामावर जायचं नाही. तरीही कामाची गरज आणि कंपनीच्या नियमांनुसार कामावर जाणं त्यांच्यासाठी सक्तीचं झालंय. पाहायला गेलं तर घरून काम करण्याचे फायदे कंपनी आणि कर्मचारी दोघांना आहेत, त्यामुळे बहुतांश कंपन्या आज देखील काही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची संधी देतात. आज अमेरिकेत असाच एक व्हिडीओ बराच व्हायरल होतोय, जिथे काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परत आणण्याचा अनोखा प्रयत्न करीत आहेत.

अमेरिकेतील व्हायरल व्हिडियो कोणता? (Work From Office)

अमेरिकेतील काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहे. कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये यावं म्हणून त्यांना आवडेल असं वातावरण तयार केलं जातंय, त्यांचं मन रमावं म्हणून त्यांची आवडती गाणी लावत कर्मचाऱ्यांना त्यावर डान्स करायची संधी देत आहेत. यापैकी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत म्हणूनच अनेक नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. “तंत्रज्ञान तुमचे मित्र नसून आम्ही तुमचे मित्र आहोत, आमच्याकडे या आमच्याशी बोला” असे म्हणत कंपन्या आपलपल्या कर्मचारी वर्गाला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये येणायची विनवणी करीत आहेत. कंपन्यांचे हे प्रयत्न पहिले तर अजूनही Work From Home ते Work From Office चा चार वर्षांचा प्रवास अजून सोपा झालेला नाही याची खात्री पटते.